29.4 C
Latur
Saturday, April 13, 2024
Homeराष्ट्रीयआता येणार ९० रुपयांचे नाणे, किंमत ५,५०० रुपये

आता येणार ९० रुपयांचे नाणे, किंमत ५,५०० रुपये

नवी दिल्ली : रिझर्व्ह बँकेच्या स्थापनेला १ एप्रिल रोजी ९० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त सरकार ९० रुपयांचे शुद्ध चांदीचे स्मृती नाणे जारी करणार आहे. नाण्यांचा संग्रह व अभ्यास करणारे सुधीर लुणावत यांच्या मते देशात पहिल्यांदाच ९० रुपयांचे नाणे जारी होत आहे.

या नाण्याची किंमत अंदाजे ५,२०० ते ५,५०० रुपयांच्या आसपास असणार आहे. ४० ग्रॅम वजन आणि ४४ मिमी व्यास असलेले हे नाणे शुद्ध चांदीचे (९९.९%) आहे. या नाण्याच्या किना-यावर २०० दातरे आहेत.

नाण्याची पहिली बाजू
नाण्याच्या मुख्य भागावर मधोमध अशोक स्तंभ असून त्याखाली ‘सत्यमेव जयते’ अशी अक्षरे आहेत. डावीकडे देवनागरी लिपीत भारत आणि उजव्या बाजूला इंग्रजी लिपीत ‘इंडिया’ असे अंकित आहे. अशोक स्तंभाच्या खाली रुपयाच्या प्रतीक चिन्हासह ९० असा आकडा अंकित करण्यात आलेला आहे.

नाण्याची दुसरी बाजू
नाण्याच्या मध्यभागी रिझर्व्ह बँकेचा लोगो अंकित केला आहे. या लोगोच्या खाली ‘आरबीआय@९०’ असे इंग्रजीत लिहिलेले असून ते रिझर्व्ह बँकेच्या ९० व्या वर्धापन दिनाचे प्रतीक आहे. हे नाणे भारतीय रिझर्व्ह बँकेच्या तिस-या स्मृती नाण्याचे प्रतीक आहे, जे १९८५ साली रिझर्व्ह बँकेच्या सुवर्ण जयंतीनिमित्त जारी करण्यात आले होते. २०१० साली रिझर्व्ह बँकेच्या प्लॅटिनम जयंतीनिमित्तही नाणे जारी केले होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR