38.1 C
Latur
Monday, May 20, 2024
Homeमहाराष्ट्रशरद पवार गटाच्या संभाव्य ९ उमेदवारांची यादी जाहीर

शरद पवार गटाच्या संभाव्य ९ उमेदवारांची यादी जाहीर

मुंबई : काँग्रेसने गुरुवारी सात उमेदवारांची पहिली यादी जाहीर केल्यानंतर शरद पवार गटाची एक संभाव्य यादी पुढे येत आहे. या यादीमध्ये बारामती लोकसभा मतदारसंघासह बीड, माढा, शिरुर, दिंडोरी, वर्धा या जागांचे उमेदवार ठरल्याचे सांगितले जात आहे.

शरद पवार गटाची ९ जणांची पहिली यादी जाहीर होऊ शकते. यामध्ये बारामती, माढा, रावेर, सातारा, शिरुर, नगर दक्षिण, दिंडोरी, बीड, वर्धा या समदारसंघांचा समावेश आहे. हे मतदारसंघ शरद पवार गटाकडे जावू शकतात.

बारामती- सुप्रिया सुळे, माढा- महादेव जानकर (रासप), सातारा- बाळासाहेब पाटील किंवा श्रीनिवास पाटील, शिरुर- अमोल कोल्हे, नगर दक्षिण- निलेश लंके, बीड- बजरंग सोनवणे किंवा ज्योती मेटे, वर्धा- अमर काळे.

दरम्यान, बीडच्या जागेवरुन राज्यामध्ये उलटसुलट चर्चा सुरु आहे. बजरंग सोनवणे यांनी शरद पवार गटामध्ये प्रवेश केल्यानंतर तेच लोकसभेचे उमेदवार असतील, असे सांगितले जात आहे. तसे झाले तर पंकजा मुंडे यांना विजय अत्यंत सोपा होऊन जाईल. परंतु ज्योती मेटे यांना शरद पवारांनी उमेदवारी दिली तर मराठा मते मेटेंना मिळवता येतील. पर्यायाने पंकजांना निवडणूक म्हणावी तेवढी सोपी ठरणार नाही.

पुण्याच्या जागेविषयी राज्यात उत्सुकता आहे. भाजपने मुरलीधर मोहोळ यांची उमेदवारी जाहीर केल्यानंतर काँग्रेसने रवींद्र धंगेकर यांना मैदानात उतरवले आहे. त्यातच नुकतेच मनसेतून बाहेर पडलेले वसंत मोरे यांनी अपक्ष निवडणुकीची घोषणा केली. त्यामुळे यावेळची पुणे लोकसभेची चुरस रंगतदार होणार, यात शंकाच नाही.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR