24 C
Latur
Thursday, September 19, 2024
Homeमहाराष्ट्रआता प्रत्येक शाळेत निनादणार ‘जय जय महाराष्ट्र माझा...’

आता प्रत्येक शाळेत निनादणार ‘जय जय महाराष्ट्र माझा…’

शासनाचे आदेश

मुंबई – ‘जय जय महाराष्ट्र माझा…’ हे गीत राज्यगीत म्हणून महाराष्ट्र राज्य सरकारने स्वीकारून १ वर्ष उलटल्यानंतरही कोणत्याही शैक्षणिक संस्थेत हे राज्यगीत गायले जात नव्हते. मनसे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी यंदाच्या मराठी भाषा गौरव दिनी राज्याचे मुख्यमंत्री शिंदे यांना पत्र लिहून प्रत्येक शैक्षणिक संस्थेत राज्यगीत वाजवले पाहिजे अशी आग्रही मागणी केली होती. अखेर मनसेच्या मागणीवर सकारात्मक पाऊल उचलत सरकारने याबाबत १५ मार्च रोजी शासन परिपत्रक काढले.

या परिपत्रकानुसार, राज्यातील शाळांमध्ये दैनिक सत्र सुरू होण्यापूर्वी राष्ट्रगीत/परिपाठ/प्रार्थना/प्रतिज्ञा यासोबत राज्यगीत वाजविले/गायले जाईल अशी सूचना करण्यात आली आहे. राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये दैनिक सत्र सुरू होण्यापूर्वी राष्ट्रगीत/परिपाठ/प्रार्थना/प्रतिज्ञा यासोबत राज्यगीत वाजविले/गायले जाईल याची दक्षता शाळा व्यवस्थापनाने घ्यावी. वरील सूचनांचे पालन राज्यातील सर्व शाळा व्यवस्थापन करतील याबाबतची दक्षता सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी घ्यावी असे निर्देश देण्यात आले आहेत.

अमित ठाकरेंच्या पत्रानंतर शासनाने या मागणीवरून सर्व शाळांना हे निर्देश दिले आहेत. पत्रानंतर तीन आठवड्यांच्या आतच राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने शासन परिपत्रक काढले आहे. त्यानुसार, सर्व माध्यमांच्या आणि सर्व व्यवस्थापनांच्या प्रत्येक शाळेत दैनिक सत्र (दररोजचे वर्ग) सुरू होताना राष्ट्रगीत/ प्रार्थना यांसोबत राज्यगीत वाजवले/गायले जाईल, याची दक्षता शाळा व्यवस्थापनांनी घ्यायची आहे आणि या सूचनेचे पालन होत आहे ना, याची दक्षता सर्व विभागीय शालेय शिक्षण उपसंचालकांनी घ्यायची आहे.

अमित ठाकरे यांनी पुढाकार घेतल्यामुळे राज्यातील शाळांमध्ये राज्यगीताचा सन्मान होत नसल्याची बाब राज्य सरकारच्या, विशेषत: शालेय शिक्षण विभागाच्या लक्षात आली. म्हणूनच शालेय शिक्षण विभागाने हे परिपत्रक काढले असून आता यापुढे प्रत्येक शाळेत ‘जय जय महाराष्ट्र माझा…’ निनादणार असल्याचे मनसेच्या वतीने सांगण्यात आले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR