22.8 C
Latur
Friday, October 18, 2024
Homeअंतरराष्ट्रीयआता अबुधाबीमध्ये जय श्रीरामचा जयघोष दुमदुमणार

आता अबुधाबीमध्ये जय श्रीरामचा जयघोष दुमदुमणार

नवी दिल्ली : अयोध्येत राम मंदिराच्या उद्घाटना नंतर आता अबुधाबीमध्ये जय श्रीरामचा जयघोष दुमदुमणार आहे. याचे कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अबुधाबीतील पहिल्या हिंदू मंदिराचे उद्घाटन होणार आहे. या संदर्भात परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, पंतप्रधान मोदी हे यूएईचे उपराष्ट्रपती, पंतप्रधान आणि संरक्षण मंत्री शेख मोहम्मद बिन राशिद अल मकतूम यांचीही भेट घेतील. झायेद स्पोर्ट्स सिटी येथे एका कार्यक्रमात ते यूएईमधील भारतीय समुदायाच्या लोकांना संबोधित करतील.

पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारपासून दोन दिवसांसाठी संयुक्त अरब अमिरातीच्या दौ-यावर असणार आहेत. यावेळी ते अबुधाबीमधील पहिल्या हिंदू मंदिराचे उद्घाटन करतील. या संदर्भात परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, २०१५ पासून पंतप्रधान मोदींची यूएईची ही सातवी भेट असेल. यादरम्यान ते राष्ट्राध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नाह्यान यांच्याशी विविध विषयांवर चर्चा करतील, तसेच पंतप्रधान मोदी आणि अल नाह्यान हे दोन्ही देशांमधील धोरणात्मक भागीदारी अधिक सखोल आणि मजबूत करण्याच्या मार्गांवर चर्चा करतील. तसेच परस्पर हिताच्या प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय मुद्यांवर विचारांची देवाणघेवाण करतील.

परराष्ट्र मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे की पंतप्रधान दुबईत होणा-या जागतिक सरकारी शिखर परिषदेला उपस्थित राहणार आहेत. २०२४ मध्ये सन्माननीय पाहुणे म्हणून सहभागी होतील आणि शिखर परिषदेत विशेष भाषण करतील. परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की पंतप्रधान यूएईचे उपाध्यक्ष, पंतप्रधान आणि संरक्षण मंत्री शेख मोहम्मद बिन राशिद अल मकतूम यांचीही भेट घेतील तसेच ते इअढर मंदिराचे उद्घाटनही करतील, त्यानंतर ते झायेद स्पोर्ट्स सिटी येथे एका कार्यक्रमाला संबोधित करतील. वअए मधील भारतीय समुदायाच्या लोकांना देखील संबोधित करतील.

भारत-यूएईमधील संबंध मजबूत होणार
परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की भारत आणि यूएई मजबूत राजकीय, सांस्कृतिक आणि आर्थिक संबंधांवर आधारित घनिष्ठ तसेच बहुआयामी संबंधांचा आनंद घेत आहेत. ऑगस्ट २०१५ मध्ये मोदींच्या यूएईच्या ऐतिहासिक भेटीनंतर, दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंध सुधारले गेले आहेत. सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारीसाठी दोन्ही देश फेब्रुवारी २०२२ मध्ये सर्वसमावेशक आर्थिक भागीदारी करार आणि स्थानिक चलन सेटलमेंट या प्रणालीवर स्वाक्षरी करतील तसेच सीमापार व्यवहारांसाठी भारतीय रुपया आणि संयुक्त अरब अमिराती दिरहामच्या वापरास प्रोत्साहन देतील.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR