31.8 C
Latur
Monday, May 13, 2024
Homeराष्ट्रीयगोव्यात अल्पवयीन मुलींच्या गर्भधारणेत वाढ

गोव्यात अल्पवयीन मुलींच्या गर्भधारणेत वाढ

पणजी : गोव्यात डिसेंबर २०२३ मध्ये अल्पवयीन मुलींमधील गर्भधारणेच्या ४ प्रकरणांची नोंद झाली आहे. मागील ६ वर्षांत राज्यभरातील पोलिस स्थानकांमध्ये सुमारे ७० बाल गर्भधारणेच्या प्रकारांची नोंद करण्यात आली आहे. त्यापैकी बहुतांश गुन्हे हे बलात्काराचे आहेत.

पोलिस तपासादरम्यान काही प्रकरणांमध्ये, बाळंतपणाची वेळ येईपर्यंत पालक किंवा संबंधित शाळांनी अल्पवयीन मुलींच्या गर्भधारणेची किंवा मुलींच्या शारीरिक बदलाची दखलही घेतली नसल्याचे समोर आले आहे. जानेवारी महिन्यात महिला पोलिस स्थानक, पणजी, कोलवा आणि पर्वरी स्थानकांत बाल गर्भधारणा प्रकरणांची नोंद झाली आहे. ती चिंताजनक आहे.

असुरक्षित लैंगिक संबंधांच्या परिणामांबद्दल सर्व शाळांमध्ये जागरूकता निर्माण करणे. अल्पवयीन मुला-मुलींना प्रलोभन, बळजबरी आणि नंतर अत्याचार कसे केले जाऊ शकतात याबद्दल सावध केले पाहिजे. तरुणांना त्यांच्या अविचारी कृतींच्या भावनिक, शारीरिक आणि सामाजिक परिणामांची जाणीव करून देणे आवश्यकता असल्याचे पिन्हो यांनी सांगितले. अनेक प्रकरणांत, मुलांना आमिषे दाखवून, त्यांच्यावर बळजबरी केल्याचे समोर आले आहे. या संबंधीही त्यांना वेळीच सावध केले पाहिजे. तरुणांना त्यांच्या अविचारी कृत्यांच्या भावनिक, शारीरिक आणि सामाजिक परिणामांची जाणीव करून दिली पाहिजे, असे पिन्हो म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR