26.3 C
Latur
Saturday, January 18, 2025
Homeराष्ट्रीयआता भारत करणार समुद्रातुनही शत्रूची शिकार

आता भारत करणार समुद्रातुनही शत्रूची शिकार

आयएनएस अरिघाटातून अणुबॅलिस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी

विशाखापट्टणम : भारताच्या लष्करी ताकदीत मोठी वाढ झाली असून आता भारत समुद्रातुनही आपल्या शत्रूची शिकार करण्यास सज्ज झाला आहे. भारतीय लष्कराने गुरुवार दि. २८ नोव्हेंबर रोजी अण्वस्त्र हल्ला करण्यास सक्षम असलेल्या बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली आहे. भारताने आयएनएस अरिघाट पाणबुडीतून आण्विक क्षमता असलेल्या ३,५०० किमी पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राचे प्रक्षेपण केले.

के-४ अणु-सक्षम बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी भारतीय नौदलाने नुकत्याच कार्यान्वित केलेल्या आण्विक पाणबुडी आयएनएस अरिघाटवरून ३,५०० किमी पल्ल्याच्या के-४ बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी घेतली. संरक्षण सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चाचणीच्या निकालांचे विश्लेषण केले जात असून, त्यानंतर संबंधित अधिकारी वरिष्ठ लष्करी आणि राजकीय नेतृत्वाला माहिती देतील. देशाची दुसरी-स्ट्राइक क्षमता प्रमाणित करण्यासाठी चाचणी महत्त्वपूर्ण आहे. यामुळे भारताला दुस-या हल्ल्याची क्षमता मिळते. म्हणजे जमिनीवर परिस्थिती चांगली नसेल तर पाणबुडीच्या साहाय्याने समुद्रातून हल्ला केला जाऊ शकतो.

पुढील चाचण्या घेण्याचा विचार
भारतीय नौदलाने ऑगस्टमध्ये विशाखापट्टणम येथील शिप बिल्डिंग सेंटरमध्ये पाणबुडी सुरू केली. क्षेपणास्त्राच्या पूर्ण-श्रेणीच्या चाचणीपूर्वी, डीआरडीओने पाण्याखालील प्लॅटफॉर्मवरून डागल्या जाणा-या क्षेपणास्त्राच्या प्रक्षेपणाच्या विस्तृत चाचण्या घेतल्या होत्या. भारतीय नौदल आता क्षेपणास्त्र प्रणालीच्या पुढील चाचण्या घेण्याचा विचार करत आहे. नौदलाकडे आयएनएस अरिहंत आणि अरिघाट या बॅलेस्टिक क्षेपणास्त्र क्षमतेच्या दोन आण्विक पाणबुड्या आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR