21.6 C
Latur
Wednesday, November 27, 2024
Homeराष्ट्रीययूपीत लव्ह जिहादसाठी आता जन्मठेप

यूपीत लव्ह जिहादसाठी आता जन्मठेप

योगी सरकारने कायद्याची व्याप्ती वाढविली किमान १० लाख रुपयांचा दंड

लखनौ : उत्तर प्रदेशमध्ये आता फसवणूक किंवा जबरदस्तीने धर्मांतराच्या प्रकरणांमध्ये कायदा अधिक कठोर असणार आहे. लव्ह जिहादचे आमिष दाखवून महिलेचा छळ करणा-या दोषींना जन्मठेपेची शिक्षा होणार आहे. अवैध धर्मांतराच्या गंभीर घटना रोखण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारने कायद्याची व्याप्ती आणि शिक्षेचा कालावधी वाढविला आहे.

आतापर्यंत अशा प्रकरणांमध्ये कमाल १० वर्षांपर्यंत शिक्षा आणि ५० हजार रुपयांपर्यंत दंडाची तरतूद होती. धर्मांतरासाठी परकीय निधी दिल्यास आता ७ ते १४ वर्षांचा तुरुंगवास आणि किमान १० लाख रुपयांचा दंड होऊ शकतो. उत्तर प्रदेश विधानसभेत बेकायदेशीर धार्मिक धर्मांतर प्रतिबंध विधेयक-२०२४ पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधानसभेत सादर करण्यात आले. त्या अंतर्गत आता, जर कोणी धार्मिक परिवर्तन घडवून आणण्याच्या उद्देशाने, कोणत्याही व्यक्तीला त्याच्या जीवितासाठी किंवा मालमत्तेसाठी धमकावत असेल किंवा हल्ला केला असेल, लग्न करण्याचे वचन दिले असेल किंवा कट रचला असेल, किंवा अल्पवयीन, स्त्रीकिंवा कोणत्याही व्यक्तीची तस्करी केली असेल तर त्याचा गुन्हा दाखल केला जाईल.

२० वर्षापर्यंत शिक्षा
आरोपींना २० वर्षांपेक्षा कमी कारावास किंवा जन्मठेप आणि दंड अशी शिक्षा होईल. पीडितेच्या उपचार खर्च आणि पुनर्वसनासाठी न्यायालय दंड म्हणून रक्कम निश्चित करू शकेल. गंभीर गुन्ह्यांप्रमाणेच आता कोणत्याही व्यक्तीला धर्मांतराच्या प्रकरणातही एफआयआर दाखल करता येणार आहे. यापूर्वी, धर्मांतरामुळे बाधित व्यक्ती, त्याचे नातेवाईक किंवा जवळच्या नातेवाईकांच्या वतीने एफआयआर दाखल करण्याची व्यवस्था करण्यात आली होती.

योगींचे कठोर कायद्याचे निर्देश
अवैध धर्मांतराची प्रकरणे वाढल्याने मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कठोर कायदा करण्याचे निर्देश दिले होते. या अनुषंगाने, उत्तर प्रदेश बेकायदेशीर धार्मिक धर्मांतरण अध्यादेश-२०२० प्रतिबंधक कायदा नोव्हेंबर २०२० मध्ये राज्यात लागू करण्यात आला. यानंतर, विधानसभेने उत्तर प्रदेश बेकायदेशीर धर्म परिवर्तन प्रतिबंध कायदा-२०२१ मंजूर केला होता, यामध्ये कमाल १० वर्षांपर्यंत शिक्षा आणि ५० हजार रुपयांपर्यंत दंडाची तरतूद करण्यात आली होती.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR