पुणे : पुणे रॅश ड्रायव्हिंग प्रकरणात रोज नवे खुलासे होत आहेत. यात ससून रुग्णालयाचादेखील कारभार समोर आला आहे. डॉ. अजय तावरे, डॉ. श्रीहरी हळनोर यांच्यावर रक्ताचे पुरावे बदलल्या प्रकरणी कारवाई करण्यात आली.
तसेच ससूनचे डीन डॉ. विनायक काळे यांना सक्तीच्या रजेवर पाठविले. आता ससून रुग्णालयातील दोन-तीन नर्सची चौकशी करण्यात येत आहे. कल्याणीनगर अपघात प्रकरणी ब्लड सॅम्पल हेराफेरीत आता ससूनच्या काही नर्सला चौकशीसाठी पुणे पोलिसांनी बोलावले.