22.1 C
Latur
Thursday, September 26, 2024
Homeराष्ट्रीयआता कामगारांचे किमान वेतन प्रतिदिन १०३५ रुपये

आता कामगारांचे किमान वेतन प्रतिदिन १०३५ रुपये

१ ऑक्टोबरपासून नवीन नियम लागू

नवी दिल्ली : केंद्र सरकारने गुरुवारी(दि.२६) परिवर्तनीय महागाई भत्ता मध्ये सुधारणा करुन देशातील असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या वेतनात वाढ केली आहे. आता कामगारांच्या किमान वेतन दरात प्रतिदिन १०३५ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. कामगार मंत्रालयाच्या निवेदनानुसार, यामुळे कामगारांना वाढत्या खर्चाचा सामना करण्यास मदत होईल. नवीन वेतन दर १ ऑक्टोबर २०२४ पासून लागू होतील.

केंद्रीय क्षेत्रातील आस्थापनांतर्गत इमारत बांधकाम, लोडिंग-अनलोडिंग, साफसफाई, घरकाम, खाणकाम आणि कृषी यासह विविध क्षेत्रात काम करणा-या कामगारांना याचा थेट लाभ मिळणार आहे. दरम्यान, अकुशल, अर्ध-कुशल, कुशल आणि उच्च कुशल तसेच भौगोलिक क्षेत्राच्या आधारे किमान वेतन दर अ, ब आणि क श्रेणींमध्ये वर्गीकृत केले जातात.

कामगारांसाठी किमान वेतन
या निर्णयानंतर भौगोलिक झोन-ए मध्ये बांधकाम, झाडूकाम, साफसफाई, लोंिडग आणि अनलोडिंगमध्ये गुंतलेल्या अकुशल कामगारांसाठी किमान वेतन दर ७८३ रुपये प्रतिदिन (रु. २०,३५८ प्रति महिना), अर्ध-कुशल कामगारांसाठी ८६८ रुपये प्रतिदिन ( २२,५६८ रुपये दरमहा) होईल. तर, कुशल कामगारांसाठी वेतन दर ९५४ रुपये प्रतिदिन (रु. २४,८०४ प्रति महिना) असेल आणि उच्च कुशल कामगारांसाठी ते १,०३५ रुपये प्रतिदिन (रु. २६,९१० प्रति महिना) असेल. केंद्र सरकार १ एप्रिल आणि १ ऑक्टोबरपासून लागू होणा-या किरकोळ महागाईतील सहा महिन्यांच्या सरासरी वाढीच्या आधारे कामगारांसाठी वर्षातून दोनदा व्हीडीए सुधारित करते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR