26.6 C
Latur
Saturday, February 8, 2025
Homeसोलापूर'एनटीपीसी'ची राख पिकांवर; शेतकऱ्यांनी दिले निवेदन

‘एनटीपीसी’ची राख पिकांवर; शेतकऱ्यांनी दिले निवेदन

सोलापूर : फताटेवाडी येथील एनटीपीसीमुळे नजीकच्या शेतकऱ्यांना त्रास होत असून, एनटीपीसीच्या चिमणीतून बाहेर पडणारी राख पिकांवर बसत आहे. यामुळे पिकांचे नुकसान होत असल्याची तक्रार करत संबंधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली.

एनटीपीसीच्या चिमणीतून पिकांवर, पाण्यात राख पडत असून, या पाण्यावरही राखेचे थर साचत आहे. येथून वाया जाणारी कोळशाची राख पाईपलाईन द्वारे पाण्यात मिसळून आहेरवाडीच्या हद्दीत साठवली जाते. याचा फटका जवळील शेतकऱ्यांना बसत आहे. संबंधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी तसेच शेतकऱ्यांना २४ तास वीज द्यावी. शेतकऱ्यांचे वहिवाट रस्ते एनटीपीसीने बंद केले असून, तात्काळ चालू करण्याची मागणी शेतकऱ्यांनी निवेदनाद्वारे दिली.

यावेळी सुभाष राठोड, विलास बावी, अंबादास कापसे, आनंद बाके, वीरेश अंजुनगे, सोमनाथ सिंदगी, पंचनाथ बाके, राज कोळी, मल्लिनाथ पिशानतोट, सिद्धाराम माळी, परमेश्वर माळी, संतोष सिंदगी, रामण्णा बाके, काशिनाथ बाके, पंडित बाके, शिवसिद्ध कापसे, प्रकाश कापसे, परशुराम सासवे, मल्लिकार्जुन वाघमारे, संगण्णा कापसे, सिद्धाराम सोलापुरे, संतोष बाके, हणमंत नागणसुरे, श्रीशैल माळी, शिवानंद वाघमारे, संगप्पा वाघमारे, श्रीशैल सोलापुरे, मळसिद्ध वाघमारे, निंगाप्पा वाघमारे आदी उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR