20.9 C
Latur
Friday, January 24, 2025
Homeमहाराष्ट्रदाऊदच्या जमिनीचा होणार लिलाव

दाऊदच्या जमिनीचा होणार लिलाव

रत्नागिरी : काही दिवसांपूर्वी मृत्यूच्या बातमीने चर्चेत आलेला अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याला राज्य सरकार आणखी एक दणका देणार आहे. रत्नागिरीतील मुंबके येथे दाऊदच्या मालकीची जमीन आहे. त्याचा लिलाव करण्यात येणार आहे. पुढील महिन्यात ५ जानेवारी २०२४ रोजी जमिनीचा लिलाव करण्यात येणार आहे.

भारतातून फरार असलेला आणि १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील प्रमुख आरोपी दाऊद इब्राहिम कासकर हा मूळचा कोकणातील आहे. रत्नागिरीतील मुंबके हे दाऊदचे मूळ गाव आहे. दाऊदने तस्करी, खंडणी आणि इतर बेकायदेशीरमार्गाने अमाप संपत्ती जमवली. त्यातून त्याने मुंबईसह विविध ठिकाणी मालमत्ता खरेदी केल्या होत्या. आता दाऊदच्या याच मालकीच्या जागांचा लिलाव करण्यात येणार आहे.

रत्नागिरीतील मुंबके येथील डॉन दाऊद इब्राहिम याच्या चार जागांचा लिलाव होणार आहे. यामध्ये चार शेत जमिनींचा समावेश आहे. जवळपास २० गुठ्याहून अधिक जमिनीचा लिलाव करण्यात येणार आहे. चार जमिनीपैकी एका जमिनीची किंमत ९ लाख ४१ हजार २८० रुपये इतकी आहे तर दुस-या शेतजमिनीची अंदाजे किंमत ८ लाख ८ हजार ७७० रुपये इतकी आहे. मुंबके येथील जमिनींच्या लिलावाबाबत २१ नोव्हेंबरमध्येच नोटीस दिली होती.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR