24 C
Latur
Thursday, September 19, 2024
Homeमहाराष्ट्रमनोज जरांगेंच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्ट; तरुणाला मारहाण

मनोज जरांगेंच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्ट; तरुणाला मारहाण

बीड : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील आक्रमक झाले आहेत. लोकसभा निवडणुकीचा निकाल चार जूनला घोषित होत आहे. त्याच दिवशी जरांगे पाटील मोठ्या आंदोलनाच्या तयारीत आहेत. आंदोलनाची तयारी सुरू असतानाच धक्कादायक घटना समोर आली आहे. मनोज जरांगे पाटील यांच्याविषयी आक्षेपार्ह पोस्ट लिहिणा-या ३५ वर्षीय तरुणाला घरात घुसून २०० ते २५० जणांच्या जमावाने मारहाण केली. छत्रपती संभाजीनगर शहरात ही घटना मंगळवारी रात्री (ता. २८) घडली.

मारहाण झालेला तरुण मुकुंदवाडी परिसरात राहणारा आहे. त्याने मनोज जरांगे यांच्यासोबत एक सेल्फी असलेला फोटो आपल्या व्हॉट्सअ‍ॅपला ठेवला. तसेच या फोटोखाली जरांगे पाटील यांच्याविषयी आक्षेपार्ह एका ओळीची पोस्ट लिहिली. या आक्षेपार्ह पोस्टचे स्क्रीनशॉट व्हायरल झाले. त्यामुळे दीपक रहात असलेल्या मुकुंदवाडीमध्ये जरांगे पाटील समर्थकांनी घरात घुसून या तरुणाला मारहाण करत मुंकुदवाडी पोलिस ठाण्यात नेले.

या तरुणाविरोधात मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल झाल्यानंतर मनोज जरांगे समर्थकांनी तरुणाच्या घराची शोधाशोध सुरू केली होती. मुकुंदवाडीमधील त्याच्या घराची माहिती कळताच तब्बल २०० ते २५० जणांच्या जमावाने तरुणाला घरात घुसून मारहाण करत घराबाहेर काढले. रात्री उशिरा तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR