कोल्हापूर प्रतिनिधी : कोल्हापूरमधून मोठी बातमी समोर येत आहे. महाविकास आघाडीचे कोल्हापूर लोकसभा मतदासंघाचे उमेदवार शाहू महाराज यांच्याविरोथात सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकण्यात आल्यानं कोल्हापुरात वातावरण चांगलंच तापलं आहे.
याविरोधात सतेज पाटलांनी पोलीस अधिक्षकांकडे तक्रार केली आहे. शाहू महाराज यांच्याविरोधात चुकीच्या पोस्ट व्हायरल होत असल्याचा आरोप सतेज पाटील यांनी केला आहे. त्यामुळे आता कोल्हापुरची निवडणूक पोलीस दरबारी पोहोचल्याचं पाहायला मिळत आहे.
दरम्यान यावेळी महाविकास आघाडीकडून कोल्हापुरातून शाहू छत्रपती यांना लोकसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. प्रचाराला सुरुवात झाली असून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. त्यातच आता शाहू महाराज यांच्याविरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकण्यात आल्यानं कोल्हापूरचं वातावरण तापलं आहे. याविरोधात सतेज पाटलांनी पोलीस अधिक्षकांकडे तक्रार केली आहे. शाहू महाराज यांच्याविरोधात चुकीच्या पोस्ट व्हायरल होत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.