28.5 C
Latur
Friday, February 7, 2025
Homeमहाराष्ट्रसोयाबीनच्या शेवटच्या दाण्यापर्यंत खरेदीचा प्रस्ताव

सोयाबीनच्या शेवटच्या दाण्यापर्यंत खरेदीचा प्रस्ताव

राज्याचे पणन मंत्री जयकुमार रावल यांची माहिती

मुंबई : सोयाबीन खरेदीचा मोठा गोंधळ उडाला आहे. दोनदा मुदत वाढ देऊनही शेतक-यांची सोयाबीन अजून बाकी आहे. सरकाराला राज्यात सोयाबीनचा किती पेरा होता, किती उत्पादन झाले याचा काहीच थांगपत्ता नाही का? असा सवाल शेतकरी विचारत आहे. खरेदीसाठी नोंदणी केलेल्या शेतक-यांची नाफेडने सोयाबीन खरेदी केली नसल्याचा आरोप होत आहे. अनेक ठिकाणी अजूनही वाहनांच्या लांबच लांब रांगा आहेत. आता याप्रकरणी राज्य सरकारने सोयाबीनच्या शेवटच्या दाण्यापर्यंत खरेदी सुरू ठेवण्याचा प्रस्ताव केंद्राला पाठविल्याची माहिती शुक्रवार दि. ७ फेब्रुवारी रोजी राज्याचे पणन मंत्री जयकुमार रावल यांनी दिली.

बारदाना नसल्याने राज्यातील अनेक जिल्ह्यात सोयाबीन खरेदीला खिळ बसली होती. सोयाबीन खरेदी रखडली होती. खरेदीची मुदत १२ जानेवारी रोजी संपली होती. तर केंद्र सरकारने ही मुदत ३१ जानेवारीपर्यंत वाढवली होती. त्यानंतर पुन्हा ही मुदतवाढ देण्यात आली. ती पण संपत आल्याने शेतकरी चिंतेत सापडला आहे. खरेदीसाठी नोंदणी केलेल्या शेतक-यांची नाफेडने सोयाबीन खरेदी केलेली नाही. राज्यात नाफेड आणि एनसीसीएफ च्या माध्यमातून ५६२ खरेदी केंद्रावर सोयाबीन खरेदी सुरू होती. ६ फेब्रुवारी २०२५ पर्यंत ५ लाख ११ हजार ६६७ शेतर्क­यांकडून ११ लाख २१ हजार ३८४ मेट्रिक टन सोयाबीनची खरेदी झालेली आहे. १४ लाख १३ हजार २६९ मेट्रिक टन पी पी एस खरेदी उद्दिष्ट्य राज्याला दिले होते.त्या उद्दिष्टाच्या जवळजवळ ८० टक्के सोयाबीन खरेदी राज्याने केली आहे.

नोंदणी केलेल्या ७ लाख ३ हजार १९४ शेतक-यांपैकी ५ लाख ११ हजार ६६७ शेतक-यांकडून सोयाबीन खरेदी झाली आहे. म्हणजे नोंदणी झालेल्या एकूण शेतक-यांपैकी ७२ टक्के शेतक-यांकडून सोयाबीन खरेदी झाली आहे. सर्वाधिक खरेदी लातूर जिल्ह्यातून १ लाख ७३ हजार ८९१ मेट्रिक टन झाली असून, त्या नंतर बुलढाणा जिल्ह्यातून १ लाख ३२ हजार ७५८ मेट्रिक टन सोयाबीन खरेदी झाली आहे.

सर्वांधिक खरेदी लातूरमधून
राज्य सरकारच्या मागणीनुसार केंद्राने सलग दोन वेळा राज्याला सोयाबीन खरेदीची मुदत वाढ दिली आता पुन्हा सोयाबीन खरेदी साठी मुदत वाढीचा प्रस्ताव पणन विभागाने केंद्र सरकारला पाठवला आहे. सर्वाधिक खरेदी लातूर जिल्ह्यातून १ लाख ७३ हजार ८९१ मेट्रिक टन झाली असून, त्या नंतर बुलढाणा जिल्ह्यातून १ लाख ३२ हजार ७५८ मेट्रिक टन सोयाबीन खरेदी झाली आहे.

अधिका-यांना सूचना जारी
राज्य सरकारच्या मागणीनुसार केंद्राने सलग दोन वेळा राज्याला सोयाबीन खरेदीची मुदत वाढ दिली आता पुन्हा सोयाबीन खरेदीसाठी मुदत वाढीचा प्रस्ताव पणन विभागाने केंद्र सरकारला पाठवला आहे. राज्याचे पणन मंत्री जयकुमार रावल यांनी ही माहिती दिली आहे. सोयाबीन खरेदी केंद्रांवर रांगेत उभे असलेल्या शेतक-यांच्या सोयाबीन खरेदी करण्याच्या अधिका-यांना सूचना दिल्याचे मंत्री रावल यांनी स्पष्ट केले. ५६२ केंद्रावर खरेदी सोयाबीनची खरेदी करण्यात आली. ११ लाख २१ हजार ३८५ टन सोयाबीनची खरेदी झाली. पाच लाख ११ हजार ६६६७ शेतक-यांकडून सोयाबीनची खरेदी केल्याचे ते म्हणाले. सर्व गोडाऊन फुल झाल्यामुळे केंद्र शासनाकडे सोयाबीन पुन्हा खरेदी करण्याची त्यांनी मागणी केली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR