24 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeराष्ट्रीयजुने पॅन कार्ड बंद होणार, नवे पॅन २.० येणार

जुने पॅन कार्ड बंद होणार, नवे पॅन २.० येणार

७८ कोटी नागरिकांना मिळणार नवे पॅन कार्ड डेटा सुरक्षिततेसाठी सरकारचा निर्णय

नवी दिल्ली : देशातील ७८ कोटी नागरिकांचे पॅन कार्ड अपग्रेड करण्यास सरकारने मंजुरी दिली आहे. या प्रक्रियेसाठी १४०० कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. युजर्सचा डेटा अधिक सुरक्षित करणे आणि डिजिटल प्रक्रिया सुलभ करणे हा त्याचा उद्देश आहे.

१९७२ पासून वापरात असलेले तुमचे पॅन कार्ड आता बदलाच्या वाटेवर आहे. मोदी सरकारने पॅन २.० च्या नवीन एडिशनला मंजुरी दिली आहे. यामुळे देशातील सुमारे ७८ कोटी लोकांना आता आपले स्थायी खाते क्रमांक (पॅन) कार्ड बदलावे लागणार आहे.

करदात्यांना गोष्टी सोप्या व्हाव्यात हा या बदलाचा मुख्य हेतू आहे. सरकारच्या मंजुरीनंतर करदात्यांच्या मनात त्यांचा पॅन क्रमांकही बदलला जाणार का आणि नवीन कार्ड बनवण्याची प्रक्रिया काय असेल असा प्रश्न निर्माण होत आहे. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटल्याप्रमाणे, पॅन कार्डची नवीन एडिशन केवळ नवीन वैशिष्ट्यांसह सुसज्ज असेल, तर आपला पॅन क्रमांक तसाच राहील. या कार्डवर एक क्यूआर कोड दिला जाईल. यात ज्यात तुमची सर्व माहिती असेल. याचा वापर करून कर भरणे किंवा कंपनीची नोंदणी करणे किंवा बँकेत खाते उघडणे सोपे होणार आहे.

वापरकर्त्यांना सुरक्षा देण्याचा प्रयत्न
पॅन कार्डचे तंत्रज्ञान पूर्णपणे अपग्रेड केले जाईल जेणेकरून ते वापरण्याचा मार्ग सोपा होईल. सर्व प्रकारच्या व्यवसायाची ओळख आणि नोंदणी सुलभ करण्यासाठी विशेष वैशिष्ट्ये जोडली जातील. पॅन कार्डशी संबंधित सर्व सेवांसाठी एक इंटिग्रेटेड प्लॅटफॉर्म तयार केला जाईल, ज्यामुळे युजर्सचा अनुभव सुधारेल. युजर्सचा डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी नवीन पॅन कार्डमध्ये सुरक्षा वैशिष्ट्ये देखील स्थापित केली जातील, जेणेकरून फसवणुकीसारख्या घटनांवर मात करता येईल.

मोफत सुधारणा होणार
पॅन कार्डच्या अपग्रेड व्हर्जनसाठी सामान्य माणसाला काहीही करण्याची गरज नाही असे केंद्रीय मंत्र्यांचे म्हणणे आहे. त्यासाठी कुठेही अर्ज करण्याची गरज भासणार नाही किंवा कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जाणार नाही. देशातील ज्या ७८ कोटी लोकांना पॅन कार्ड देण्यात आले आहे त्यांना विभागाकडून नवीन पॅन कार्ड पाठविण्यात येणार आहे.

नंबर तोच राहणार
पॅन कार्ड अपग्रेड करण्याच्या प्रक्रियेत नंबर बदलले जाणार नाहीत, असे सरकारने स्पष्टपणे सांगितले आहे. प्रत्येकाचा पॅन नंबर एकच राहील आणि जोपर्यंत नवीन कार्ड तुमच्या हातात येत नाही तोपर्यंत तुम्ही तुमची सर्व कामे जुन्या पॅन कार्डच्या माध्यमातून करत राहा.

अर्ज करण्याची गरज नाही
नवीन कार्डसाठी अर्ज करण्याची गरज नाही किंवा त्यासाठी पैसे खर्च करण्याची ही गरज नाही. सरकार नवीन पॅन कार्ड थेट तुमच्या पत्त्यावर पाठवेल.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR