22.1 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeमहाराष्ट्रठाण्यात भातसा नदी काठावरील ढाब्यांना आग, पर्यटकांची धावपळ

ठाण्यात भातसा नदी काठावरील ढाब्यांना आग, पर्यटकांची धावपळ

ठाणे : ठाणे जिल्ह्यातील पर्यटकांचे आवडते पर्यटन स्थळांपैकी एक असलेले खडवली येथील भातसा नदीचा किनारा. या ठिकाणी दुपारी अचानक आग लागली. यावेळी नागरीकांची तारांबळ उडाली.

हॉटेल व ढाब्यांना अचानक आग लागल्याची घटना घडली. या आगीमुळे पर्यटकांची मोठ्या प्रमाणावर तारांबळ उडल्याने त्यांची जीव वाचवण्यासाठी धावपळ सुरु झाली.

विशेष म्हणजे या ठिकाणी असा प्रकार घडला ही माहिती अग्निशामक दलाला मिळाली नव्हती. यामुळे दलाच्या गाड्या या ठिकाणी येवू शकल्या नाहीत. पर्यायी परिसरात असलेल्या गावक-यांनीच नदीचे पाणी मारून आगीवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न केला.

मात्र उन्हाळ्याचे दिवस असल्याने जोरदार वारा वाहत होता. यामुळे आगीवरती नियंत्रण मिळवणे कठीण होत होते. अखेर काही स्थानिकांनी याची माहिती अग्निशामक दलाला दिली. त्यानंतर या आगीवर संपूर्णपणे नियंत्रण मिळवण्यात यश आले. मात्र या घटनेमुळे पुन्हा एकदा पर्यटन ठिकाणावर हॉटेल चालक, ढाबे चालक अग्न्रिशामक उपकरण बाळगत नसल्याचे समोर आले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR