Homeमहाराष्ट्रअक्षय्य तृतीयेनिमित्ताने ‘दगडूशेठ’ गणपती बाप्पाला ११ हजार आंब्यांचा महाभोग

अक्षय्य तृतीयेनिमित्ताने ‘दगडूशेठ’ गणपती बाप्पाला ११ हजार आंब्यांचा महाभोग

पुणे : प्रतिनिधी
अक्षय्य तृतीयेनिमित्त पुण्यातील दगडूशेठ गणपतीला ११ हजार आंब्यांचा महाभोग दाखवण्यात आला. साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असलेल्या अक्षय्य तृतीयेच्या मंगलदिनी दरवर्षी हा महानैवेद्य बाप्पाला दाखवला जातो. याच दिवशी गणरायाचे दर्शन व्हावे, याकरिता भाविकांनी पहाटेपासून मंदिरात रांगा लावल्या होत्या.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे मंदिरात आंबा महोत्सव आयोजित करण्यात आला होता. यामध्ये गणपती बाप्पांना ११ हजार आंब्यांचा महानैवेद्य अर्पण करण्यात आला. पुण्यातील आंब्यांचे सुप्रसिद्ध व्यापारी देसाई आंबेवालेचे संचालक मंदार देसाई व कुटुंबीयांच्या वतीने हा नैवेद्य दाखवण्यात आला.

मंदिरात रविवारी पहाटे तीन वाजता ब्रह्मणस्पती सुक्त अभिषेक झाला. त्यानंतर पहाटे ४ वाजता गायिका विदुषी मंजुषा पाटील यांनी स्वराभिषेकातून गायनसेवा अर्पण केली. सकाळी ८ वाजता गणेशयाग देखील झाला. आंब्याचा प्रसाद ससूनमधील रुग्णांना, श्रीवत्समधील मुलांना तसेच वृद्धाश्रम व दिव्यांग मुलांच्या संस्था व मंदिरात भाविकांना देण्यात येणार आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR