22.4 C
Latur
Monday, September 16, 2024
Homeपरभणीगीता जयंतीनिमित्त गीता पारायण संपन्न

गीता जयंतीनिमित्त गीता पारायण संपन्न

परभणी : शहरातील विद्यानगर येथील गणपती मंदिरात गीता जयंतीच्या निमित्ताने श्रीमद् भगवद गीता पारायणाचे आयोजन करण्यात आले होते. प्रफुल्ल चामणीकर यांच्या पुढाकारातून वर्षभर श्रीमद् भगवत गीता शिकवली जाते.

त्या उपक्रमांतर्गत यंदाच्या पाचव्या वर्षी गीता जयंतीनिमित्त सामूहिक गीता पठणाचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी गीता परिवारातर्फे पुरस्कृत झालेल्या अवंती अविनाश चौधरी यांचा संपूर्ण गीता पाठांतराबद्दल विशेष सत्कार करण्यात आला. याप्रसंगी हभप शंकर आजेगावकर, बंडू नाना सराफ यांची विशेष उपस्थिती होती. कार्यक्रमाची सांगता आरती व एकादशी निमित्त महाप्रसादाने झाली.

याप्रसंगी परिसरातील भाविकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रफुल्ल चामणीकर, अरुण कुमार पेडगावकर, विष्णुपंत औंढेकर, सुहास बिडकर, शरद नाकाडे आदींनी परिश्रम घेतले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR