24.6 C
Latur
Friday, September 20, 2024
Homeसोलापूरशिवजयंतीनिमित्त सोलापूरकरांना मीळणार 'आनंदाचा शिधा'

शिवजयंतीनिमित्त सोलापूरकरांना मीळणार ‘आनंदाचा शिधा’

सोलापूर : दसरा, दिवाळीनंतर आता पाच लाख सोलापूरकरांना पुन्हा आनंदाचा शिधा मिळणार आहे. अयोध्यातील श्रीराम प्राणप्रतिष्ठानिमित्त तसेच आगामी शिवजयंतीनिमित्त शिधापत्रिका धारकांना आनंदाचा शिधा देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. फेब्रुवारीपूर्वी धान्य वाटपाचे आदेश राज्य शासनाने दिले असून, लाभार्थीनी याचे स्वागत केले आहे.

आनंदाच्या शिधा किटमध्ये अर्धा किलो रवा, एक लिटर तेल, एक किलो साखर यासोबत आता अर्धा किलो पोहे अन् अर्धा किलो मैदा मिळणार आहे, तेही शंभर रुपयांत. सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंबातील लाभार्थी योजनेतील पात्र शिधापत्रिकाधारकांना गुढीपाडवा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, दसरा अन् दिवाळीनिमित्त यापूर्वी आनंदा शिधा वाटप झाला. साखर, रवा, चनाडाळ प्रत्येकी एक किलो तर खाद्यतेल एक लिटर असे चार शिधा पदार्थ समाविष्ट असलेला आनंदाचा शिधा प्रति पत्रिका याप्रमाणे १ लाख १४ हजार ७०३ लाभार्थ्यांना, गौरी गणपती निमित्त एक लाख १४ हजार लाभार्थ्यांना तसेच दिवाळी सणानिमित्त एक लाख १७ हजार लाभार्थ्यांना प्रति संच १०० रुपये दराने वितरित करण्यात आला आहे.

आनंदाचा शिधा या योजनेचे ग्रामीण भागात ३ लाख ८५ हजार १७५, तर शहरी भागात एक लाख १२ हजार ३१४ लाभार्थी आहेत. दि. १ फेब्रुवारीपासून शिधा वाटप होणार आहे. अद्याप दुकानदारांना शिधा मिळालेला नाही. शासनाने फेब्रुवारी पूर्वी आनंदाचा शिधा वाटप करण्याचे आदेश दिले आहेत.असे सोलापूर रेशन दुकानदार संघ,अध्यक्ष सुनील पेंटर यांनी सांगीतले.

शासनाने अशा विविध सणांच्या अनुषंगाने आनंदाचा शिधा गोरगरीब लाभार्थ्यांना वाटप करून त्यांच्या सण आनंदित करण्याचा प्रयल केला आहे. तसेच सोलापूर शहरात १९ शिवभोजन केंद्रामार्फत प्रतिदिन जवळपास ५४ हजार लाभार्थ्यांना दहा रुपयांत शिवभोजन थाळी उपलब्ध करून देऊन शासनाने गोरगरीब लाभार्थ्यांना अन्न उपलब्ध करून दिले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR