18.9 C
Latur
Saturday, December 28, 2024
Homeक्रीडाकसोटीच्या दुस-या दिवशी भारतीय खेळाडू काळी पट्टी बांधून मैदानात

कसोटीच्या दुस-या दिवशी भारतीय खेळाडू काळी पट्टी बांधून मैदानात

मेलबर्न : वृत्तसंस्था
मेलबर्नच्या मैदानावर भारत आणि ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ यांच्यातील बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी २०२४-२५ च्या चौथ्या सामन्याच्या दुस-या दिवसाची सुरुवात होताच, भारतीय संघाचे सर्व खेळाडू काळ्या पट्ट्या बांधून मैदानावर खेळायला आले.

खरे तर, २६ डिसेंबरच्या रात्री भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे वयाच्या ९२ व्या वर्षी निधन झाले. महान अर्थतज्ज्ञ आणि देशाचे दोन वेळा पंतप्रधान राहिलेले मनमोहन सिंग यांच्या निधनामुळे संपूर्ण देश शोकसागरात बुडाला असून, त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी भारतीय संघाने सामन्याच्या सुरुवातीला काळी पट्टी बांधली होती.

खेळाडूंनीही वाहिली श्रद्धांजली
मनमोहन सिंग हे महान अर्थतज्ज्ञ होते. २००४ ते २०१४ पर्यंत ते देशाचे पंतप्रधान होते. त्यांच्या निधनानंतर भारतीय संघ काळी पट्टी बांधून मैदानावर खेळण्यासाठी आला होता, त्याचवेळी क्रीडा जगतातील इतर अनेक माजी खेळाडूंनीही त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे, ज्यात वीरेंद्र सेहवाग, हरभजन आणि युवराज सिंग यांच्या नावांचा समावेश आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR