सोलापूर : सोलापूर शहरातील वाहतूक शाखेकडून ई चलनाच्या माध्यमातून बेशिस्त वाहन चालकांना करण्यात आलेल्या दंडाची रक्कम ही वरचेवर वाढतच आहे. विशेष मोहिमा राबवूनदेखील ही दंडाची रक्कम वसुल होण्याचे प्रमाण नगण्य आहे. त्यामुळे काही कालावधीसाठी सोलापूर शहरात वाहतूक शाखेकडून बेशिस्त वाहनचालकांवर करण्यात येणाऱ्या कारवाईवेळी ई चलन करून तो दंड थकीत न ठेवता दंडाची रक्कम जागेवरच घेण्यात येणार असल्याचे पोलिस आयुक्त एम राजकुमार यांनी सांगितले.
डिसेंबर महिन्यात लोकअदालतीची आयोजन करण्यात आलेले आहे. या पार्श्वभूमीवर शहर वाहतुक नियंत्रण विभागाने वाहतुकीचे नियम तोडणाऱ्या ७ हजार वाहन चालकांना समन्स बजावले आहेत. समन्स मिळालेल्या वाहन चालकांनी दंड भरला नाही तर त्यांना थेट जेलची हवा खावी लागणार आहे. सात वाहतुकीच्या केसेसचे मिळताच न्यायालयात दंड भरल्यास वाहन हजार समन्स जावून चालक न्यायालयाच्या कारवाईपासून वाचू शकतील.
लोकअदलातीच्या अगोदर शहर वाहतुक विभागाकडून समन्स येऊनसुध्दा न्यायालयात वाहतूक दंडाची रक्कम न भरलेल्या ३५० वाहनचालकांविरुध्द नोव्हेंबर महिन्यात अटक वारंट काढलेले आहे. त्यापैकी ११५ जणांना ताब्यात घेऊन त्यांना न्यायालयात पाठविण्यात आल्यानंतर त्यांनी दंड भरून अटक वारंट रद्द करून घेतले आहे.
उर्वरीत वाहन चालकांना वॉरंट पोहोचवण्यात आले आहेत. तरी वाहन चालकांना वाहतुक केसेसच्या कायदेशीर दंडाची भरणा करून जिल्हा न्यायालयाकडून वॉरंट रद्द करून घेता येईल. जर समजा दंड भरला नाही तर अटकेची कारवाई होणार आहे.
त्यामुळे शहर पोलिस आयुक्त कार्यालयाकडून वाहतुकीच्या नियम मोडणाऱ्यांना जागेवरच दंड आकारण्यास सुरुवात केलेली आहे. त्यामुळे चालू बरोबर प्रलंबित दंड ही वसूल केला जात आहे. वाहतूक केसेस असलेल्या सात हजार जणांना समन्स बजावलेले आहेत, त्या समन्स बजावलेल्या वाहन चालकांना लोक अदालत जावून दंड नाही भरला तर जिल्हा न्यायालयाकडून अटक वॉरंट काढले जाणार आहे. त्यामुळे वाहन चालकांना जेलची हवा खावी लागणार आहे.