21.7 C
Latur
Thursday, September 19, 2024
Homeअंतरराष्ट्रीयपुन्हा एकदा सुनीता विल्यम्सची अवकाश यात्रा टळली

पुन्हा एकदा सुनीता विल्यम्सची अवकाश यात्रा टळली

शेवटच्या क्षणाला अंतराळ मोहीम रद्द

नवी दिल्ली : भारतीय वशांच्या सुनीता विल्यम्स यांची अंतराळ मोहीम पुन्हा एकदा टळली आहे. स्पेसक्राफ्ट उड्डाणासाठी काही मिनिटे शिल्लक असताना ही मोहीम रद्द करण्यात आली आहे. नासाच्या कॅनेडी स्पेस सेंटरवरुन भारतीय वशांच्या सुनीता विल्यम्स या बोईंग स्टारलाईनर स्पेसक्राफ्टमधून उड्डाण करणार होत्या, पण ही मोहीम तूर्तास थांबवण्यात आली आहे.

बोईंग स्पेसक्राफ्टमध्ये आलेल्या बिघाडामुळे ही मोहीम पुढे ढकलण्यात आल्याची माहिती मिळत आहे. पुन्हा काही दिवसात ही मोहीम पुन्हा अमलात आणण्याचा प्रयत्न केला जाईल असे नासाच्या अधिका-यांनी सांगितले. विशेष म्हणजे याआधीही मोहिमेमध्ये अडथळा आला होता. शेवटच्या क्षणी मोहीम रद्द करण्याचा निर्णय घ्याला लागला होता.

सुनीता विल्यम्स या बुट्स विलमोरे यांच्यासोबत बोईंग स्टारलाइनरमधून अंतराळात जाणार होत्या. जर त्यांची आजची मोहीम यशस्वी ठरली असती तर ते ऐतिहासिक ठरले असते. कारण, बोईंगच्या स्पेसक्राफ्टमधून अंतराळारवीर अंतराळात जाण्याची ही पहिली वेळ असली असती. पण, तूर्तास या ऐतिहासिक घटनेची प्रतीक्षा करावी लागणार आहे. बोईंग स्टरलाइनरची निर्मिती अंतराळवीरांना आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर नेण्यासाठी आणि त्यानंतर त्यांना परत आणण्यासाठी करण्यात आली आहे. अंतराळामध्ये मानवी जीवन आणि संशोधन यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी ही मोहीम महत्त्वाची आहे. यासंदर्भात अनेकदा चाचण्या घेण्यात आल्या आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR