सोलापूर : माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ इयत्ता बारावीचा निकाल सोमवारी दुपारी एक वाजता ऑनलाइन जाहीर झाला. जिल्ह्याचा एकूण निकाल ८८.६२ टक्के इतका लागला. यावेळेस देखील मुलींचा निकालात टक्का अधिक आहे. परीक्षेला एकूण ३० हजार २९३ विद्यार्थी तर २४ हजार ६० विद्यार्थिनी बसल्या होत्या. यापैकी २५ हजार ६४१ विद्यार्थी व २२ हजार ५२७ विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या.
इयत्ता बारावीच्या परीक्षेत सोलापूर जिल्ह्यातील एकूण ५४ हजार ८७५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यापैकी ५४ हजार ३५३ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यापैकी एकूण ४८ हजार १६८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. शहरात व ग्रामीण भागातील अनेक महाविद्यालयांनी यंदाही १०० टक्के निकालाची परंपरा कायम ठेवली आहे. महाविद्यालयाने उत्तीर्ण झालेल्या व प्रथम द्वितीय तृतीय क्रमांक आलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान केला. यावेळी यावेळी एकमेकांना पेढे भरवत प्राध्यापक,विद्यार्थ्यांनी आनंदोत्सव साजरा केला.
बारावीचे एकूण विद्यार्थी
मुले – ३०५७४
मुली – २४३०१
एकूण – ५४८७५
परीक्षेला बसलेले विद्यार्थी –
मुले – ३०२९३
मुली – २४०६०
पास झालेले विद्यार्थी
मुले – २५६४१
मुली – २२५२७
उत्तीर्ण टक्केवारी
८८.६२