29.5 C
Latur
Monday, January 20, 2025
Homeमहाराष्ट्रएका आरोपीला २१ तारखेपर्यंत पोलिस कोठडी

एका आरोपीला २१ तारखेपर्यंत पोलिस कोठडी

दुस-या आरोपीचे वय तपासण्याचे आदेश बाबा सिद्दिकी हत्या प्रकरण

मुंबई : अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री यांची शनिवार दि. १२ ऑक्टोबर रोजी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी रविवारी आरोपींना न्यायालयात हजर केले असता सरकारी आणि आरोपींच्या वकिलांमध्ये बराच वेळ युक्तिवाद झाला. दोन्ही बाजूंच्या वकिलांचा युक्तीवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने न्यायालयाने आरोपी गुरुनैल सिंगला २१ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. तर दुसरा आरोपी असलेल्या धर्मराज कश्यप वय तपासले जाणार आहे.

एका आरोपीचे वय १७ असल्याचा युक्तिवाद त्यांच्या वकिलांकडून करण्यात आला होता. दरम्यान, कोर्टाने वकिलांचा युक्तिवाद गांभीर्याने घेत आरोपीची टेस्ट करण्याच्या सूचना पोलिसांना दिल्या आहेत. ही टेस्ट होईपर्यंत आरोपी धर्मराज कश्यप पोलिसांच्या ताब्यात राहणार आहे. पोलिस ही टेस्ट करून आरोपीला पुन्हा कोर्टात हजर करा असे आदेश न्यायालयाने पोलिसांना दिले आहेत.

सरकारी वकिल न्यायालयात म्हणाले, आरोपी आपली नावही तपासात वेगवेगळी सांगत आहेत. पोलिसांकडील आधारकार्ड दाखवले असता. त्यावरील तारखेनुसार जन्मतारीख २१ होते. पुण्यात हे आरोपी काय करत होते कोणाकडे राहत होते? आधी गुन्ह्यातील तपास पहावा त्यात काही मिळतयं का त्या आधारावर पुढील कस्टडी द्यावी. दहा दहा टीम त्याचा शोध घेत आहेत तरीही हे मिळत नाही. एखाद्या पिच्चरमधील स्टोरीप्रमाणे हा कट रचलेला आहे. आम्हाला १४ दिवसांची कोठडी मिळायला हवी. आरोपीनी ज्यांन मारलं आहे ती राज्याचे माजी राज्यमंत्री आहेत गुन्हा गंभीर स्वरुपाचा आहे.

यातील आरोपी पुणे आणि मुंबईत राहून बाबा सिद्धीकी यांची रेकी केली होती. या आरोपींना हत्यार कोणी दिलं वाहन कोणी दिलं याचा तपास होणं महत्वाचं आहे. या आरोपींकडून २८ जिवंत कातूस सापडली आहेत. मग फक्त बाबा सिद्धीकी यांनाच मारायचा हेतू होता की अन्य ही कोणाला मारण्याचा हेतू होता? यात अन्य दोन आरोपी फरार आहेत. हे कुठल्या गँगशी जोडलेले आहेत का? असे सवालही सरकारी वकिलांनी न्यायालयात उपस्थित केले आहेत. बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणातील आरोपी धर्मराज कश्यप याला न्यायमूर्तींनी वय विचारले असता त्याने स्वत:चं वय १७ सांगितले. अल्पवयीन आरोपी म्हणून ट्रीटमेंट मिळावी, अशी मागणीही वकिलांकडून करण्यात आली होता. त्यानंतर न्यायालयाकडून आरोपीचे वय तपासण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR