29.4 C
Latur
Thursday, January 23, 2025
Homeपरभणीतहसीलदार, नायब तहसीलदार संघटनेचे एक दिवसीय रजा आंदोलन

तहसीलदार, नायब तहसीलदार संघटनेचे एक दिवसीय रजा आंदोलन

परभणी : नायब तहसीलदार यांचे ग्रेड पे वाढविण्यासाठी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तहसीलदार, नायब तहसीलदार संघटनेच्या वतीने आज मंगळवार, दि.५ डिसेंबर रोजी एक दिवसीय रजा आंदोलन करण्यात आले. या संदर्भात जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले.

महाराष्ट्र राज्य तहसीलदार, नायब तहसीलदार संघटनेने नायब तहसीलदार राजपत्रीत वर्ग दोन यांचे ग्रेड पे ४८०० करण्याच्या अनुषंगाने वेतन त्रुटी समिती बक्षी समिती समक्ष केलेल्या सादरीकरणात नमूद केलेल्या बाबींच्या अनुषंगाने तसेच यापूर्वी शासनास देण्यात आलेल्या निवेदनावर तात्काळ कारवाई करून सदरची मागणी मान्य करून त्या संदभार्तील शासन निर्णय तात्काळ निर्गमित करण्यात यावे अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

या निवेदनावर तहसीलदार डॉ.संदीप राजपुरे , श्रीराम बेंडे, शारदा चोंडेकर , दिनेश झांपले, नायब तहसीलदार गणेश चव्हाण, लक्ष्मीकांत खळीकर, गजानन इनामदार, श्रीमती तमना, स्वप्ना अंभोरे, अनिता वडवळकर, विजय मोरे, पंढरीनाथ शिंदे, सोपान ठोंबरे, प्रशांत वाकोडकर, व्ही. डी. महाजन, सुग्रीव मुंढे, विनोद पवार आदींची स्वाक्षरी आहे. एक दिवसीय रजा आंदोलनात तहसीलदार, नायब तहसीलदार यांनी सहभाग नोंदवला हो

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR