22.4 C
Latur
Monday, September 16, 2024
Homeधाराशिवजवळे दुमाला येथील एकाचा टमटम-कार अपघातात मृत्यू

जवळे दुमाला येथील एकाचा टमटम-कार अपघातात मृत्यू

धाराशिव : प्रतिनिधी
टमटम व कारची धडक होऊन झालेल्या अपघातात धाराशिव तालुक्यातील जवळे दुमाला येथील एका ५० वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. हा अपघात सोमवारी दि. १८ डिसेंबर रोजी सायंकाळी सातच्या सुमारास आळणी पाटी येथे झाला. या प्रकरणी धाराशिव ग्रामीण पोलीस ठाणे येथे कार चालकाच्या विरोधात दि. १९ डिसेंबर रोजी विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जवळे दुमाला ता. धाराशिव येथील मयत युवराज सदाशिव काटे हे सोमवारी दि.१८ डिसेंबर रोजी सायंकाळी सातच्या सुमारास आळणी पाटी ते ढोकी रस्त्यावरून टमटम चालवित जात होते. दरम्यान स्विफ्ट डिझायर गाडी क्र. एमएच ४६ एडी ६१७७ च्या चालकाने त्याच्या ताब्यातील कार ही भरधाव वेगात, निष्काळजीपणे चालवून युवराज काटे यांच्या टमटमला पाठीमागून धडक दिली. या अपघातात युवराज काटे हे गंभीर जखमी होवून त्यांचा मृत्यू झाला.

अपघात झाल्यानंतर कार चालकाने सदर कार ही तेथेच ठेवून जखमीस मदत न करता व अपघाताची माहिती न देता पसार झाला. या प्रकरणी मयताचा चुलतभाऊ सुनिल भगवानराव काटे रा. जवळे दु. ता. जि. धाराशिव यांनी दि.१९ डिसेंबर रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.वि.सं. कलम- २७९, ३३८, ३०४ (अ) सह १३४ (अ) (ब), १८४ मोवाका अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR