धाराशिव : प्रतिनिधी
कार-दुचाकी अपघातात दुचाकीवरील एकाचा मृत्यू झाला. हा अपघात तुळजापूर शहरालगत असलेल्या घाटात झाला. प्रवीण निवरगी असे अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी तुळजापूर पोलीस ठाणे येथे ४ डिसेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी सांगितले की, आदर्शनगर सोलापूर (एमआयडीसी) येथील प्रविण सचिन निवरगी व अरविंद शरणप्पा काबनुर हे दोघे दि. २९ नोव्हेंबर रोजी सायंकाळी तुळजापुरला जात होते. त्यांची दुचाकी तुळजापूर घाटात उतारावर आली असता त्या दरम्यान कार क्र एमएच ३१ एफ ई ५४३५ च्या चालकाने दुचाकीला धडक दिली. कार चालकाने त्याचे ताब्यातील कार ही भरधाव वेगात, निष्काळजीपणे चुकीच्या दिशेने चालवली. त्यामुळे अपघात झाला.
या अपघातात प्रविण निवरगी हे गंभीर जखमी होवून त्यांचा मृत्यू झाला. अरविंद काबनुर हे गंभीर जखमी झाले. कार चालक हा अपघात करुन अपघाताची माहिती न देता कारसह पसार झाला. या प्रकरणी नरेंद्र शरणाप्पा काबनुर यांनी दि. ४ डिसेंबर रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे.