23.5 C
Latur
Wednesday, January 15, 2025
Homeधाराशिवकन्हेरवाडी पाटीजवळ दुचाकी अपघातात एक ठार

कन्हेरवाडी पाटीजवळ दुचाकी अपघातात एक ठार

धाराशिव : प्रतिनिधी
रस्त्याच्या कडेला असलेल्या मातीच्या ढिगा-यावर दुचाकी जाऊन झालेल्या अपघातात एक ठार तर एकजण गंभीर जखमी झाला. हा अपघात दि. २७ जानेवारी रोजी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास कळंब तालुक्यातील कन्हेरवाडी पाटीजवळ झाला. कैलास कालिदास केंद्रे रा. धावडी ता. अंबाजोगाई जि. बीड असे अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी कळंब पोलीस ठाणे येथे दि. २८ जानेवारी रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी सांगितले की, धावडी ता. अंबाजोगाई येथील मयत कैलास कालिदास केंद्रे व अरविंद रामधान केंद्रे हे दोघे दि.२७ जानेवारी रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास दुचाकीवरून कळंब ते येरमाळा महामार्गावरून जात होते. त्यांची दुचाकी कळंब तालुक्यातील कन्हेरवाडी पाटीजवळ आली असता दुचाकी रस्त्याच्या कडेला असलेल्या मातीच्या ढिगा-यावर गेली. यावेळी झालेल्या अपघातात कैलास कालिदास केंद्रे यांचा मृत्यू झाला तर दुचाकीवर बसलेले अरविंद केंद्रे गंभीर जखमी झाले. या प्रकरणी अरविंद केंद्रे यांनी दि.२८ जानेवारी रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.वि.सं. कलम- २७९, ३३७, ३३८, ३०४ (अ) सह १८४ मोवाका अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

 

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR