22.4 C
Latur
Monday, September 16, 2024
Homeमुख्य बातम्या‘वन नेशन, वन इलेक्शन’बाबत राष्ट्रपतींनी सूचना मागविल्या

‘वन नेशन, वन इलेक्शन’बाबत राष्ट्रपतींनी सूचना मागविल्या

नवी दिल्ली : देशात एकाच वेळी सर्व प्रकारच्या निवडणुका घेण्याबाबत अर्थात ‘वन नेशन, वन इलेक्शन’ सध्या पडताळणी केली जात आहे.

दोन महिन्यांपूर्वी याबाबत माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आली होती. पण इतके दिवस हा विषय चर्चेत नसताना अचानक याबाबत महत्वाची अपडेट समोर आली आहे.

‘वन नेशन, वन इलेक्शन’बाबत हाती आलेली माहिती अशी की, यासाठी नेमलेल्या समितीचे अध्यक्ष माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी जनतेकडून याबाबत सूचना मागवल्या आहेत. यासाठी समितीच्या वेबसाईटवर या सूचना पाठवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
‘वन नेशन, वन इलेक्शन’ व्यवस्था राबवण्यासाठी विशिष्ट कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणे गरजेचे आहे. त्यामुळे सध्याच्या प्रशाकीय व्यवस्थेत बदल करुन वन नेशन वन इलेक्शन व्यवस्थेला पूरक असे बदल करण्यासाठी जे योग्य ते बदल करावे लागतील, ते काय असू शकतील याबाबत या सूचना अपेक्षित आहेत.

या सूचना कुठे आणि कधीपर्यंत पाठवायच्या याचा तपशीलही या समितीने जाहीर केला. त्यानुसार, या समितीच्या वेबसाईटवर http://onoe.gov.in अथवा [email protected] या ई-मेल आयडीवर या सूचना पाठवायच्या आहेत. यासाठी १५ जानेवारी २०२४ ही डेडलाईन देण्यात आली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR