25.7 C
Latur
Thursday, September 19, 2024
Homeराष्ट्रीयकोरोनामुळे एका रुग्णाचा मृत्यू

कोरोनामुळे एका रुग्णाचा मृत्यू

कोच्ची : गेल्या काही वर्षांपासून जगाची झोप उडवणा-या कोरोना व्हायरसने पुन्हा एकदा धाकधूक वाढवली आहे. कोरोना व्हायरस आणि कोरोनाच्या संसर्गाबाबत पुन्हा एकदा सतर्कतेची परिस्थिती निर्माण झाली आहे. कोविडचा नवा सबव्हेरियंट भारतात आल्याचे समोर आले आहे. कोविड-१९ चा सबव्हेरियंट जेएन.१ चे पहिले प्रकरण केरळमध्ये आढळून आले आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती दिली. तसेच, कोरोनाने ग्रस्त असलेल्या रुग्णाचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे.

१८ नोव्हेंबर रोजी आरटी-पीसीआर चाचणीत ७९ वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाल्याचे पाहायला मिळाले होते. महिलेने सांगितले की, तिला इन्फ्लूएंझा सारख्या आजाराची सौम्य लक्षणे आहेत आणि ती कोरोनामधून बरी झाली आहे. दरम्यान, केरळचे आमदार केपी मोहनन यांनी शनिवारी कन्नूर येथील पनूर नगरपालिका रुग्णालयात कोविड-१९ प्रतिबंधात्मक उपायांची पाहणी केली. सध्या भारतातील कोविड-१९ रुग्णांपैकी ९० टक्क्यांहून अधिक रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे आढळून आली आहेत आणि होम आयसोलेशनमध्ये आहेत.

यापूर्वी, सिंगापूरमधील एका भारतीय प्रवाशालाही जेएन.१ सब-व्हेरिएंट आढळून आला होता. ते तामिळनाडूतील तिरुचिरापल्ली जिल्ह्यातील रहिवासी असून २५ ऑक्टोबर रोजी सिंगापूरला गेले होते. तिरुचिरापल्ली जिल्ह्यात किंवा तमिळनाडूमधील इतर ठिकाणी हा स्ट्रेन आढळल्यानंतर कोरोनाबाधितांच्या संख्येत कोणतीही वाढ झालेली नाही. भारतात जेएन.१ व्हेरियंटचा इतर कोणताही दुसरा रुग्ण आढळून आलेला नाही अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR