24 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeधाराशिवपिकअपने दिलेल्या धडकेत नायगाव येथील एक ठार

पिकअपने दिलेल्या धडकेत नायगाव येथील एक ठार

धाराशिव : प्रतिनिधी
पिकअपने दुचाकीला दिलेल्या धडकेत नायगाव ता. कळंब येथील एका ५० वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. नायगाव ते मुरूड जाणा-या रस्त्यावर लोकनायक कॉलेज समोर हा अपघात झाला. या प्रकरणी शिराढोण पोलीस ठाणे येथे २६ नोव्हेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बाळासाहेब साहेबराव शितोळे असे अपघातात ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नायगाव ता. कळंब येथील बाळासाहेब साहेबराव शितोळे हे नायगाव ते मुरुड रस्त्याने यामाहा कंपनीच्या दुचाकीवर बसून जात होते. त्यावेळी त्यांची दुचाकी लोकनायक कॉलेजजवळ आली असता पिकअप क्र एमएच २४ एयु ९४०२ च्या चालकाने धडक दिली. पिकअप चालकाने त्याच्या ताब्यातील वाहन हे भरधाव वेगात,

निष्काळजीपणे व राँग साईडने चालवुन बाळासाहेब शितोळे यांच्या दुचाकीला समोरुन जोराची धडक दिली. या अपघातात बाळासाहेब शितोळे हे गंभीर जखमी झाले. उपचार दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी फिर्यादी रामदास साहेबराव शितोळे यांनी दि. २६ नोव्हेंबर रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.वि.सं. कलम- २७९, ३३७, ३३८, ३०४ (अ) सह मोवाका कलम १८४ अन्वये गुन्हा नोंदवला आहे

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR