31.7 C
Latur
Friday, September 20, 2024
Homeधाराशिवट्रक-दुचाकीच्या धडकेत उळेवाडी येथील एक ठार

ट्रक-दुचाकीच्या धडकेत उळेवाडी येथील एक ठार

धाराशिव : प्रतिनिधी
ट्रक व दुचाकीची धडक होऊन झालेल्या अपघातात उळेवाडी ता. दक्षिण सोलापूर येथील एकजण ठार झाला. तर दुचाकीवरील दुसरा गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात सोलापूर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर मुर्टा पाटीजवळ ७ डिसेंबर रोजी रात्री झाला. या प्रकरणी नळदुर्ग पोलीस ठाणे येथे दि. ८ डिसेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उळेवाडी ता. दक्षिण सोलापूर येथील मयत शंभुहरी प्रकाश धनवडे व जखमी रियाज नुरअहमद शेख हे दोघे दि. ७ डिसेंबर रोजी रात्रीच्या सुमारास जळकोट ता. तुळजापूर येथून दुचाकीवरून राष्ट्रीय महामार्गावरून जात होते. त्यांची दुचाकी मुर्टा पाटीजवळ आली असता ट्रक क्र एमएच १० सीआर ५३६७ च्‌या चालकाने त्याचे ताब्यातील ट्रक ही भरधाव वेगात, निष्काळजीपणे चालविली. शंभुहरी धनवडे यांचे दुचाकीला पाठीमागून धडक दिली.

या अपघातात शंभुहरी धनवडे हे गंभीर जखमी होवून त्यांचा मृत्यू झाला. तर रियाज शेख हे गंभीर जखमी झाले. या प्रकरणी मयताचा भाऊ गोपाळ प्रकाश धनवडे यांनी दि. ८ डिसेंबर रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.वि.सं. कलम- २७९, ३३७, ३३८, ३०४ (अ) सह १८४ मोवाका अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR