24.6 C
Latur
Sunday, December 1, 2024
Homeलातूरलातुरात भरधाव हायवाने एकास चिरडले

लातुरात भरधाव हायवाने एकास चिरडले

लातूर : भरधाव हायवाने एका दुचाकीचालकाला चिरडल्याची घटना लातुरातील नवीन रेणापूर नाका चौकात रविवारी सायंकाळी ४ वाजता घडली. यामध्ये अहमदपूर तालुक्यातील सलगरा येथील रहिवासी भरत उद्धव मोटे (३०) हे ठार झाले आहेत. याबाबत एमआयडीसी पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

पोलिसांनी सांगितले, साई गावाकडून रविवारी सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास लातूर शहराकडे दुचाकीवरून संसारोपयोगी साहित्य घेऊन निघालेल्या मोटे दाम्पत्याला नवीन रेणापूर नाका चौकात भरधाव हायवाने (एमएच ४४ यू ८३४४) चिरडल्याची घटना घडली. या अपघातात हायवाच्या समोरील टायरखाली आल्याने दुचाकीवरील भरत उद्धव मोटे यांचा जागीच मृत्यू झाला. त्याचबरोबर सोबत असलेली महिला गंभीर जखमी झाली असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. जखमी महिलेला लातुरातील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. दरम्यान, घटनेनंतर वाहतुकीची कोंडी झाली होती. चारही मार्गांवर वाहनांच्या रांगा लागल्याने पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली.

पोलिसांनी सांगितले, लातूर शहरातील अंबाजोगाई रोडवर नवीन रेणापूर नाका चौकात एका मालवाहतूक करणा-या भरधाव हायवाच्या टायरखाली दुचाकी आल्याने एक जण जागीच ठार झाला असून, एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास घडली. घटनेनंतर जखमींना तत्काळ शासकीय रुग्णालयात दाखल केले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR