24 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeमहाराष्ट्रकांद्याचा दर वधारला

कांद्याचा दर वधारला

शेतक-यांना मोठा दिलासा! जुना कांदा ५,५०० तर नवीन ४,५०० रुपये

लालगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीत बाजाराच्या दिवशी महाराष्ट्रातील जुन्या कांदा दरात प्रतिक्विंटल १५००, तर कर्नाटकातील नवीन कांद्याच्या दरात एक हजार रुपयांची वाढ झाली. जुना कांदा चार ते पाच हजार ५०० तसेच नवीन कांद्याचा तीन ते ४५०० हजार रुपये दर होता.

बुधवारी (ता. २९) बाजारात कांद्याच्या ८० गाड्यांची आवक झाली होती. रविवारी (ता.२६) पुणे, नाशिक, नगर या भागात झालेल्या पावसामुळे कांदा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे बाजारात आवक कमी झाली असून, दरात मोठी वाढ पाहायला मिळाली.
बाजारात नवीन कांद्याच्या ६० व जुन्या कांद्याच्या २० गाड्यांची आवक झाली होती. जुना लहान कांदा चार ते ४५०० रुपये, मध्यम कांदा ४५०० ते ४८०० व मोठा कांद्याचा ४८०० ते ५५०० रुपये दर होता. बागलकोट, विजापूर आदी भागातील नवीन लहान कांद्याला ३ हजार ते ३५०० रुपये, मध्यम कांदा ३५०० ते ४ हजार रुपये व मोठा कांदा ४ हजार ते ४५०० रुपये दराने उपलब्ध होता.

कांद्याला मागणी वाढली
महाराष्ट्रातील कांदा असलेल्या पट्ट्यात पडलेल्या पावसामुळे कांदा दरात मोठी वाढ झाली आहे. आगामी काळात महिनाभरात बाजारपेठेवर परिणाम होण्याची शक्यता आहे. नवीन कांद्याला पावसाचा फटका बसल्यामुळे जुन्या कांद्याला मागणी वाढली आहे. सुमारे महिनाभर कांदा दर ५,५०० च्या घरात होता. मात्र, गेले दोन आठवडे दर खाली घसरला. ३५०० ते चार हजारपर्यंत दर पोहोचला होता. मात्र, बुधवारच्या बाजारात दराने पुन्हा भरारी घेतली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR