22.3 C
Latur
Sunday, September 8, 2024
Homeधाराशिवदिडपट रक्कमेचे आमिष दाखवून पाच लाखाची ऑनलाईन फसवणूक

दिडपट रक्कमेचे आमिष दाखवून पाच लाखाची ऑनलाईन फसवणूक

धाराशिव : प्रतिनिधी
एक तासात दिडपट रक्कम देण्याचे आमिष दाखवून सायबर भामट्यांनी एकाची ५ लाख ८ हजार रूपयांची ऑनलाईन फसवणूक केली. ही घटना उमरगा तालुक्यातील एकोंडी येथे २८ ते ३० जानेवारी २०२४ या कालावधीत घडली. या प्रकरणी सायबर पोलीस ठाणे येथे दि. १२ फेब्रुवारी रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी सांगितले की, एकोंडी ता. उमरगा येथील अजयकुमार मोतीराम चव्हाण यांना दि.२८ जानेवारी रोजी अनोळखी व्यक्तीने व्हॉटसपवरती अ‍ॅड करुन ग्रुपमध्ये आलेल्या टेलीग्राम लिंकला फिर्यादीने टच केले. फिर्यादी श्री. चव्हाण यांना टेलीग्राम ग्रुपमध्ये अ‍ॅड करुन भामट्याने टेलीग्राम वरती एक लिंक पाठवून ही ट्रेडींगचे अकाउंट लिंक आहे, असे सांगून फिर्यादीला युजर नेम व पासवर्ड तयार करायला सांगितला. टेलीग्राम ग्रुपला जॉईन करुन वेगवेगळे टास्कचे टेलीग्राम मेसेज देवून टास्कचे नावाखाली ज्यादा रिर्टनचे अमिष दाखविले. एक तासाभरात रक्कमेच्या दीडपट रक्कम फिर्यादीस परत बॅक खात्यावर जमा करण्याचे आमिष दाखविले. फिर्यादीची तीन टप्यात ५ लाख ८ हजार रूपयांची ऑनलाईन फसवणूक केली. या प्रकरणी अजयकुमार चव्हाण यांनी दि.१२ फेब्रुवारी रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन सायबर पोलीस ठाणे येथे कलम ४२०, भा.दं.वि.सं. सह माहिती तंत्रज्ञान सुधारीत अधिनियम २००८ कलम ६६ सी, ६६ डी अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

 

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR