34 C
Latur
Sunday, May 11, 2025
Homeधाराशिवउमरगा येथील एकाची पावणेदोन लाखाची ऑनलाईन फसवणूक

उमरगा येथील एकाची पावणेदोन लाखाची ऑनलाईन फसवणूक

धाराशिव : प्रतिनिधी
उमरगा शहरातील एका व्यक्तीची सायबर भामट्याने १ लाख ७६ हजार ५९९ रूपयांची ऑनलाईन फसवणूक केली. या प्रकरणी रोहित कदम यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सायबर पोलीस ठाणे येथे दि. १० जानेवारी रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी सांगितले की, जयअंबे टॉवर, उमरगा येथे राहणारे रोहीत विजयकुमार कदम यांना एका अनोळखी व्यक्तीने दि. २५ व २६ ऑक्टोबर रोजी मोबाईलवर कॉल करुन तुम्हाला जॉबची ऑफर आहे, असे सांगितले. टेलीग्राम ग्रुपला जॉईन करुन वेगवेगळे टास्कचे मेसेज दिले. टास्कचे नावाखाली ज्यादा रिटर्नचे अमिष दाखविले. त्यांना पैसे भरण्यास सांगितले. रोहित कदम यांनी ६ हजार व ४६ हजार रूपये भरले. त्यांनी ज्यादा रिटर्न मागितले असता येणारा परतावा दिला नाही. त्यांनतर त्यांना ग्रुपमधून काढून टाकले. फिर्यादीने कस्टमर केअरचा नंबर सर्च करुन त्यावर कॉल केला.

समोरील बोलणा-या व्यक्तीने मोबाईलवर रस्क डेक्स अ‍ॅप घेण्यास सांगितले. फिर्यादीचा मोबाईल अ‍ॅक्सेस घेवून बँक डेबीट कार्डर्ची माहिती घेवून एचडीएफसी खात्यावरुन ऑनलाईन पध्दतीने ५० हजार, ५० हजार, २४ हजार ५९९ रूपये असे एकूण १ लाख ७६ हजार ५९९ रूपये काढून घेतले. त्यांची ऑनलाईन फसवणुक केली आहे. या प्रकरणी रोहीत कदम यांनी दि.१० जानेवारी रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन सायबर पोलीस ठाणे येथे कलम ४२०, भा.दं.वि.सं. ६६ (सी), ६६ (डी) माहिती तंत्रज्ञान सुधारित अधिनियम २००८ अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR