22.3 C
Latur
Sunday, September 8, 2024
Homeक्रीडाफायनलमध्ये केकेआरला केवळ ११४ धावांचे लक्ष्य

फायनलमध्ये केकेआरला केवळ ११४ धावांचे लक्ष्य

चेन्नई : आयपीएलच्या संपूर्ण मोसमात ६ वेळा २०० धावांचा टप्पा ओलांडणा-या हैदराबादचा संघ अंतिम सामन्यात ११३ धावांत सर्वबाद झाला. चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर रविवारी कोलकाताला ११४ धावांचे सोपे लक्ष्य मिळाले.

हैदराबादने नाणेफेक जिंकून कोलकाताविरुद्ध फलंदाजीचा निर्णय घेतला. क्वालिफायर-१ प्रमाणेच कोलकाताच्या वेगवान गोलंदाजांनी हैदराबादच्या फलंदाजांना सुरुवातीला बॅकफूटवर आणले. स्टार्कने दोन विकेट घेऊन पहिल्याच षटकातून ब्रेक थ्रू दिला. कोलकाताने ६ गोलंदाज वापरले आणि ५ बळी घेतले. हैदराबादकडून एडन मार्करामने (२० धावा) सर्वाधिक धावा केल्या.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR