27.1 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeमहाराष्ट्रहिंदुस्थानात हिंदूंनाच स्थान आहे...; कालीचरण महाराज

हिंदुस्थानात हिंदूंनाच स्थान आहे…; कालीचरण महाराज

छ. संभाजीनगर : केंद्र सरकार आणत असलेल्या वक्फ बोर्ड कायद्यात सुधारणा आणावी, यासाठी मुस्लिमांनी काँग्रेस ऍण्ड कंपनीकडे मागणी केली आहे. पण हा हिंदुस्थान आहे. इथे हिंदूंचे स्थान आहे त्यामुळे हिंदू व्होट बँकांची क्रांती पाहिजे, असे विधान कालीचरण महाराज यांनी या प्रचार रॅलीत केले. ते महायुतीचे उमेदवार संजय शिरसाट यांच्या प्रचारसभेत सहभागी झाले होते.

दरम्यान, विधानसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात असतानात महायुतीकडून हिंदुत्वाचा मुद्दा अधिकच पेटवला गेला आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये कालीचरण महाराज यांनी हिंदुत्वाच्या मुद्यावर जहाल भाषण केले.

कालीचरण महाराज यांनी सुरुवातीपासून आक्रमक भाषण केले. हिंदू व्होट बँकांची क्रांती पाहिजे, असे सांगून छत्रपती शिवाजी महाराजांनी धर्म रक्षणासाठी राक्षस मारले, असे विधान केले. यानंतर त्यांनी त्यांच्या स्फोटक भाषणाचा धडाका सुरू ठेवला. हिंदू मतदानाला जात नाही, त्यामुळे मुस्लिमधार्जिणे लोक राजा बनू लागलेत. मुस्लिमांना खुश करण्याचा प्रयत्न केला जात आहे, ते मतदानात सहभागी होतात. याशिवाय मौलाना एकतर्फी मतदान करण्याचे आवाहन करतात, यावर कालीचरण महाराज यांनी घणाघात केला.

सर्वच आमदार-खासदार मुस्लिमांना खुश ठेवण्यासाठी त्यांचे तळवे चाटतात. लाडकी बहीण योजना, रोजगार देऊ, असे सांगून खुश ठेवतात. फुकटात काहीतरी तुकडे टाकायचे, असे सर्वच राजकीय पक्ष करतात. फुकटात वापरणा-यांमध्ये सर्वांत जास्त मुस्लिम आहेत, असे गंभीर विधान कालीचरण महाराज यांनी केले.

कातडी सोलली जात आहे ती हिंदूंची, असे सांगून अहिंसा संभव नाही. हिंसा करावीच लागणार. छत्रपती शिवाजी महाराजांनी धर्म रक्षणासाठी राक्षस मारले. हिंदू मतदान करतील, तर हिंदू कट्टर राजा बसेल, असे विधानही कालीचरण महाराज यांनी केले. हिंदू व्होट बँकांची क्रांती पाहिजे. १०० टक्के दंगली मुसलमानांकडूनच होतात, असा दावाही कालीचरण महाराज यांनी यावेळी केला.

जरांगेंवर जोरदार टीका
कालीचरण महाराज यांनी मनोज जरांगे यांच्या आंदोलनावर नाव न घेता टीका केली. यावेळी त्यांनी वेगवेगळे शब्दप्रयोग वापरले. आता एक आंदोलन हिंदूंमध्ये फूट पाडण्यासाठी झाले. लाखो लोक मुंबईत आले. काही जातीपातीसाठी आरक्षणासाठी नाही तर फक्त हिंदुत्व तोडण्यासाठी निघालेला राक्षस आहे, अशी घणाघाती टीका कालीचरण महाराजांनी केली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR