26.2 C
Latur
Tuesday, February 25, 2025
Homeमहाराष्ट्रमंत्र्यांचे पीए, ओएसडी ठरविण्याचे अधिकार मुख्यमंत्र्यांनाच

मंत्र्यांचे पीए, ओएसडी ठरविण्याचे अधिकार मुख्यमंत्र्यांनाच

भ्रष्ट, फिक्सर लोकांना मान्यता देणार नाही फडणवीसांनी ठणकावले संजय राऊतांनी केले मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन

मुंबई : प्रतिनिधी
आमचे स्वीय सहाय्यक आणि विशेष कार्य अधिकारीही मुख्यमंत्रीच ठरवतात, आमच्या हातात काहीही नाही, अशी खंत कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी एका कार्यक्रमात व्यक्त केली होती. त्याला उत्तर देताना, मंत्र्यांचे स्वीय सहाय्यक आणि विशेष कार्य अधिकारी नेमण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांचाच असतो हे कोकाटेंना हे माहिती नसेल, असे सुनावताना, चुकीच्या लोकांच्या नियुक्त्या केल्या जाणार नाहीत असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी ठणकावले आहे.

माझ्याकडे मंत्र्यांकडून १२५ नावे आली होती. या नावांमध्ये फिक्सर’ म्हणून ओळखल्या जाणा-यांना आणि ज्यांना चौकशीला सामोरे जावे लागत आहे अशा १६ लोकांनी मान्यता दिली नाही असे फडणवीस यांनी स्पष्ट केले. त्यांच्या या भूमिकेबद्दल ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी फडणवीस यांचे अभिनंदन केले. कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी एका कार्यक्रमात आमचे स्वीय सहाय्यक आणि विशेष कार्यासीन अधिकारीही मुख्यमंत्री ठरवतात, आमच्या हातात काही नाही असे विधान केले होते.

यावर बोलताना फडणवीस यांनी, मंत्र्यांचे स्वीय सहाय्यक आणि विशेष कार्यासीन अधिकारी नेमण्याचा अधिकार हा मुख्यमंत्र्यांचाच असतो. त्यासाठीचा प्रस्ताव मंत्री मुख्यमंत्र्यांकडे पाठवत असतात. त्यावर मुख्यमंत्री अंतिम निर्णय घेतात. माझ्याकडे आलेल्या नावांमध्ये ज्यांची नावे चुकीच्या कामांमध्ये आली होती, ‘फिक्सर’ म्हणून ज्यांची ओळख आहे, ज्यांची चौकशी सुरू आहे, त्यांना मी मान्यता दिली नाही. कॅबिनेट मंत्र्यांकडून या पदांसाठी १२५ नावे मुख्यमंत्र्यांकडे पाठविली, मात्र त्यापैकी १०९ नावांनाच मंजुरी देण्यात आली असे फडणवीस यांनी स्पष्ट केले होते.

शिवसेना ठाकरे गटाचे नेते खा. संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांच्या या भूमिकेबद्दल त्यांचे अभिनंदन केले. त्याच वेळी नाकारलेली नावे कोणत्या मंत्र्यांकडून आली होती ते ही जाहीर करावे अशी मागणी केली. आपल्याकडे आलेल्या माहितीनुसार नाकारलेल्या १६ लोकांपैकी १३ लोकांची शिफारस शिंदे यांच्या मंत्र्यांनी, तर ३ नावे राष्ट्रवादीच्या मंत्र्यांकडून आलेली होती, असा दावा राऊत यांनी केला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR