29.2 C
Latur
Friday, May 17, 2024
Homeसोलापूरशहरात केवळ तीन जलतरण तलाव, जुळे सोलापुरातील जलतरण तलाव बंद

शहरात केवळ तीन जलतरण तलाव, जुळे सोलापुरातील जलतरण तलाव बंद

सोलापूर : शहरातील ११ लाख लोकांसाठी मार्कंडेय जलतरण तलाव (अशोक चौक) स्वा. सावरकर जलतरण तलाव (हुतात्मा चौक) व केएलई अ‍ॅक्वा जलतरण तलाव (जुळे सोलापूर) असे केवळ ३ जलतरण तलाव आहेत. त्यापैकी जुळे सोलापुरातील जलतरण तलाव सध्या बंद अवस्थेत आहे.

शहराच्या लोकसंख्येचा विचार करता दर ३ लाख ६६ हजार लोकांसाठी१ जलतरण तलाव सध्या उपलब्ध आहे. त्यापैकी एक तलाव बंद आहे म्हणजे जवळपास ५. ५० लाख लोकांसाठी १ जलतरण तलाव सध्या उपलब्ध आहे. यापूर्वी अनेकवेळा या जलतरण तलावांवर निधी खर्च करण्यात आला आहे. मात्र महापालिका प्रशासनास या सुधारणेनंतर जलतरण तलावातून मिळणारे उत्पन्न वाढविण्यात अपयश आले आहे.

त्यापैकी दोन आंतरराष्ट्रीय दर्जाचे जलतरण तलाव आहेत. मात्र गेल्या अनेक दिवसांपासून हे जलतरण तलाव बंद असल्यामुळे खेळाडूंचे खूप मोठे नुकसान झाले आहे. सध्या नव्याने सुशोभीकरण केल्यानंतर हे दोन्ही तलाव खेळाडूंसाठी खुले करण्यात येणार आहेत. मात्र शहरातील लोकसंख्येच्या मानाने एकूण ६ जलतरण तलाव शहरात असणे आवश्यक आहे. त्यापैकी तीन जलतरण तलाव खेळाडूंसाठी राखीव ठेवणे अत्यंत गरजेचे आहे कारण सोलापूर शहराने आजतागायत जलतरण क्रीडा प्रकारांमध्ये मोठमोठे खेळाडू देशाला दिले आहेत, उर्वरित तीन जलतरण तलाव सर्वसामान्य नागरिकांसाठी कायमस्वरूपी खुले ठेवण्यात आले पाहिजेत.असे श्रविका प्रशालेचे क्रीडाशिक्षक सुहास छंचुरे म्हणाले.

महापालिकेच्या स्वा. सावरकर व मार्कंडेय तलाव या दोन जलतरण तलावात स्प्रिंग बोर्ड व ड्रायफिटसाठी जिल्हा नियोजन समितीकडून १ कोटी ६१ लाख रुपयाचा निधी नावीन्यपूर्ण योजनेतून मंजूर झाला आहे. यामुळे शहरातील आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय स्तरावरील डायव्हिंग स्टार्सची मोठी सोय होणार आहे. यातून खेळाडूंना दर्जेदार सुविधा उपलब्ध होणार आहे. तरीही उर्वरित लोकांसाठी शहरात आणखी जलतरण तलाव बांधणे गरजेचे शहरात सध्या एकूण तीन जलतरण तलाव आहेत. जलतरणची करार मुदत संपत्याने महापालिका प्रशासनाने जुळे सोलापुरातील जलतरण तलाव जिल्हा क्रीडा कार्यालयाकडे पुन्हा हस्तांतरण करण्याची तयारी केली आहे. सध्या शहरात स्वा. सावरकर व मार्कंडेय जलतरण तलावांवर अवलंबून राहावे लागणार असल्याने या दोन्ही तलावांवरचा ताप वाढणार आहे. नवीन जलतरण तलाव बांधण्याचा सध्या कोणताही प्रस्ताव नाही.असे महापालिका क्रीडा विभाग सचिव अप्पासाहेब पाटील यांनी सांगीतले.

शहरातील जलतरण तलाव व्यावसायिक स्वरूपात वापरून त्यातून उत्पन्न वाढविण्यासाठी आवश्यक योजना करणे गरजेचे आहे. प्रत्येक वेळेस मक्तेदार शोधण्यापेक्षा महापालिका प्रशासनाने स्वतः या तलावांची देखभाल करणे गरजेचे आहे. शहराचा विस्तार झाल्यानंतर आणखी नवीन जलतरण तलाव बांधल्यास शहरातील दोन्ही तलावांवरचा ताण कमी होणार आहे. नागरिकांची जलतरणाची सोय होऊन महापालिकेचे उत्पन्न वाढण्यास मदत होणार आहे. याबरोबरच सध्या सुधारणाकेलेल्या जलतरण तलावांची देखीलयोग्य निगा राखणे तितकेच महत्त्वाचे व आवश्यक आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR