22.8 C
Latur
Saturday, December 21, 2024
Homeमहाराष्ट्र‘मातोश्री’ बंगला बाळासाहेबांचे स्मारक म्हणून खुले करा

‘मातोश्री’ बंगला बाळासाहेबांचे स्मारक म्हणून खुले करा

स्मृतिदिनी भाजपची मोठी मागणी

मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज १७ नोव्हेंबर रोजी अकरावा स्मृतिदिन आहे. बाळासाहेंबाना अभिवादन करण्यासाठी राज्यभरातून शिवसैनिक शिवाजी पार्कवर दाखल झालेत. अभिवादनासाठी सकाळपासूनच शिवाजी पार्कवर रांगा लागल्या आहेत. तसेच अनेक राजकीय नेत्यांनी त्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातूनही अभिवादन केले आहे.

भाजप आमदार राम कदम यांनी बाळासाहेबांच्या स्मृतिदनी पोस्ट करत मातोश्री बंगला जनतेसाठी खुले करण्याची मागणी केली आहे. बाळासाहेब ज्या मातोश्री बंगल्यामध्ये अनेक वर्ष राहिले ,तो बंगला जिवंत स्मारक म्हणून जनतेसाठी खुला करावा अशी मागणी राम कदम केली आहे. राम कदम यांनी पोस्ट करत ही मागणी केली आहे.

बाळासाहेब ठाकरे ज्या मातोश्री बंगल्यात राहिले. तेच खरे बाळासाहेबांचे खरे जिवंत स्मारक आहे. ते जनतेसाठी कधी खुले करणार? असा सवाल राम कदम यांनी उद्धव ठाकरे यांना केला आहे. राम कदम म्हणाले, उद्धव ठाकरे सध्या राहायला मातोश्री २ वर गेले आहेत. जुन्या मातोश्री बंगल्यात बाळासाहेब अनेक वर्ष राहिले. अनेक धाडसी निर्णय ज्या बंगल्यात त्यांनी घेतले. दिवस रात्र त्यांचा ज्या स्थळी वावर होता. तेच खरे जिवंत स्मारक जनतेसाठी का खुले नाही? असा सवाल केला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR