23.3 C
Latur
Friday, November 15, 2024
Homeछत्रपती संभाजीनगरसॉफ्टवेअरने दरवाजा उघडून दोन महागड्या कार लंपास

सॉफ्टवेअरने दरवाजा उघडून दोन महागड्या कार लंपास

हायटेक किटने ४० मिनिटांत कार घेऊन पसार

छत्रपती संभाजीनगर : साधारण दहा ते बारा महिन्यांच्या अंतराने शहारात पुन्हा हायटेक किटने कार चोरी करणारी टोळी सक्रिय झाली आहे. उस्मानपु-यातून शनिवारी रात्रीतून दोन महागड्या कार चोरून नेल्या. अवघ्या ४० मिनिटांमध्ये चोरी केली. तिस-या कारमध्ये अपयश आल्यानंतर त्यांनी महत्त्वाचे पार्ट्स काढून कार तशीच सोडून पोबारा केला.

आर्थिक सल्लागार प्रशांत शिंदे (४७, रा. एन-४, सिडको) यांनी २६ ऑगस्ट रोजी सायंकाळी त्यांची ुंडाई अल्काझार कार (एमएच २० एफवाय ४९०७) उस्मानपु-यातील जयनगरमधील कार्यालयासमोर उभी करून दुचाकीने घरी गेले. मंगळवारी सकाळी ते कार्यालयात गेले असता, कार दिसली नाही. आजूबाजूला चौकशी केल्यावर जवळच राहणारे व्यावसायिक महेश मुकेश सेहगल (४३) यांची ुंडाई कंपनीची क्रेटा कार (एमएच २० डीजे ८५२६) देखील चोरीला गेल्याचे समजले. शिवाय, जयंत सोनी (६२) यांची क्रेटा कार या टोळीने चोरण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यात त्यांना अपयश आल्याने म्युजिक सिस्टम पॅनल व अन्य महत्त्वाचे पार्ट्स चोरले.

आलिशान कारमधून आले चोरटे
२०२२, २०२३ या वर्षांमध्ये ठराविक काळानंतर या टोळ्या सक्रिय झाल्या होत्या. बाप लेकाची एक टोळी बुलढाणा, तर दुसरी टोळी जालन्यात आहे. अशा टोळ्या दिल्ली, झारखंडमध्ये अधिक सक्रिय आहेत. राज्यातील चोरांनीही हे तंत्रज्ञ अवगत केले. उस्मानपु-यात सोमवारी मध्यरात्री २ ते २.३० दरम्यान चोर क्रेटा कारमधून आले. त्यांच्यासोबत दुचाकीवर साथीदार होते. एक चोर दरवाज्याजवळ तर दुसरा बोनटजवळ उभा राहून किटच्या मदतीने कार उघडतात.

नेमके काय आहे तंत्रज्ञान ?
– ओबीडी डिव्हाइसचा वापर होतो. हे चीनमधून मागवले जाते.
– किटद्वारे कारचा इंजिन कोड स्कॅन करून विशिष्ट सॉफ्टवेअरच्या मदतीने ते कारचे लॉक उघडतात.
– एकाच वेळी दरवाजा व बोनटमधील वायरमध्ये बदल करून दरवाजा उघडतात.
– ओबीडी डिव्हाइस कारला कनेक्ट केले जाते. त्यानंतर कारचे सेन्सर, जीपीएस बंद होते.
– मग बनावट चावीने कार सुरू करून पसार होतात.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR