28 C
Latur
Wednesday, September 25, 2024
Homeलातूर‘मांजरा’चे दोन दरवाजे उघडून विसर्ग सुरू

‘मांजरा’चे दोन दरवाजे उघडून विसर्ग सुरू

लातूर : बीडसह उस्मानाबाद आणि लातूर जिल्ह्यातील बहुतांश भागाचा प्रमुख जलस्रोत असणारा मांजरा प्रकल्प आज बुधवारी, २५ सप्टेंबर रोजी सकाळी तुडुंब भरला. सध्या पाणलोट क्षेत्रात होणा-या पावसामुळे मांजरा धरणात होणारी पाण्याची आवक पाहता धरण पाणी पातळी नियंत्रित करण्याच्या दृष्टीने दुपारी १२:३० वाजता मांजरा प्रकल्पाचे द्वार क्र. १ आणि ६ असे एकूण २ द्वार हे ०.२५ मीटर उंचीने उघडून मांजरा नदीपात्रात १७३० क्युसेक (४९.०० क्युसेक्स) इतका विसर्ग सोडण्यात आला आहे.

धनेगाव येथील मांजरा नदीवर सिंचनाच्या उद्देशाने बांधण्यात आलेल्या मांजरा धरणाची साठवण क्षमता एकूण २२४.०९३ दशलक्ष घनमीटर एवढी आहे.

मांजरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसाने धरणाच्या वरच्या बाजूस असलेले लहान-मोठे तलाव व बंधारे पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर मांजरा धरणातही पाण्याची आवक वेगाने सुरू झाली होती. तसेच धरणात पाण्याची होणारी आवक पाहता विसर्ग कमी अथवा जास्त करण्याची कार्यवाही करण्यात येईल, असे आवाहन करण्यात आले. आहे.

प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा
दरम्यान, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून कोणीही नदीपात्रात प्रवेश करू नये व कुठलीही जीवित अथवा वित्त हानी होणार नाही याची खबरदारी घ्यावी. आपत्कालीन परिस्थितीत तालुका प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहन पूर नियंत्रण कक्ष, मांजरा धरण यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR