32.7 C
Latur
Wednesday, May 7, 2025
Homeअंतरराष्ट्रीय‘ऑपरेशन सिंदूर’, भारताचा पाकिस्तानवर एअर स्ट्राईक

‘ऑपरेशन सिंदूर’, भारताचा पाकिस्तानवर एअर स्ट्राईक

पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी ऑपरेशन सिंदूर लाँच केलं आहे. या ऑपरेशनअंतर्गत भारतीय लष्कर आणि हवाई दलाने मिळून पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील नऊ दहशतवादी ठिकाणांवर क्षेपणास्त्रांनी हल्ला करण्यात आला आहे. भारतीय सैन्यदलानं पाकव्याप्त काश्मीरमधील मुजफ्फराबादमध्ये 9 ठिकाणांवर स्ट्राइक केला आहे.

मध्यरात्री १ वाजून ४४ मिनिटांनी सर्जिकल स्ट्राईक
भारतीय लष्कराने एका प्रसिद्धीपत्रकात दिलेल्या माहितीनुसार, या कारवाईअंतर्गत, लष्कराने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांना लक्ष्य केलं, जिथून भारताविरुद्ध दहशतवादी हल्ले आखले जात होते आणि हल्ल्याचे निर्देश दिले जात होते. या हल्ल्यांमध्ये भारतीय लष्कर, नौदल आणि हवाई दल या तिन्ही दलांच्या अचूक शस्त्र प्रणालींचा वापर करण्यात आला.

या ९ ठिकाणांवर एअर स्ट्राईक
१) बहावलपूर
२) मुरिदके
३) गुलपूर
४) भीमबर
५) चक अमरु
६) बाग
७) कोटली
८) सियालकोट
९) मुजफ्फराबाद

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची प्रतिक्रिया
ऑपरेशन सिंदूर बाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नावर डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की मी याबाबत ऐकलेय, इट इज शेम, अपेक्षा आहे की हे लवकर समाप्त होईल. कोणत्याही दोन बलवान देशांना युद्धाच्या मार्गावर जाताना पाहू शकत नाही. या दोन्ही देशांचा इतिहास जुना असून तणाव वाढलेला आहे. मात्र, जगाला युद्ध नकोय शांतता पाहिजे, असं ट्रम्प म्हणाले. हे लवकर संपेल अशी आशा बाळगतोय, असं ट्रम्प म्हणाले.

भारताच्या ऑपरेशन सिंदूरवर अमेरिकेच्या विदेश विभागाचे प्रवक्ते म्हणाले की आम्हाला याबाबत माहिती आहे. आम्ही सध्या अधिक भाष्य करणार नाही. सर्व घटनांवर नजर ठेवून आहोत. वॉशिंग्टनमध्ये भारतीय उच्चायुक्तालयाकडून जारी करण्यात आलेल्या वक्तव्यानुसार भारतानं एअरस्ट्राईक केल्यानंतर अजित डोभाल यांनी अमेरिकेच्या एनएसए आणि विदेश मंत्री मार्को रुबियो यांना फोनवरुन माहिती दिली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR