22.8 C
Latur
Thursday, December 12, 2024
Homeमहाराष्ट्रविरोधकांचा बहिष्कार मागे

विरोधकांचा बहिष्कार मागे

पटोले, आदित्य ठाकरे, अमित देशमुख, वडेट्टीवार यांनी घेतली सदस्यत्वाची शपथ २८० आमदारांनी घेतली शपथ, आठ जणांची गैरहजेरी

मुंबई : (प्रतिनिधी)
ईव्हीएम बाबतच्या तक्रारी व मारकडवाडी गावातील दडपशाहीच्या निषेध करताना महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानसभा सदस्यत्वाची शपथ घेण्यास नकार दिला होता. आघाडीचे नेते शरद पवार व उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केल्यानंतर रविवारी बहिष्कार मागे घेण्यात आला. त्यामुळे अधिवेशनाच्या दुस-या दिवशी सत्ताधारी व विरोधकांसह तब्बल १०६ आमदारांनी सदस्यत्वाची शपथ घेतली. उर्वरीत आठ आमदार अनुपस्थित राहिल्याने त्यांचा शपथविधी आता सोमवारी होणार आहे.

विधानसभा निवडणुकीत निवडून आलेल्या आमदारांना विधानसभा सदस्यत्वाची शपथ देण्यासाठी ७ डिसेंबरपासून विधिमंडळाच्या तीन दिवसांच्या विशेष अधिवेशनाला सुरुवात झाली. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सुमारे १७३ सदस्यांनी शपथ घेतली आहे. विधिमंडळाच्या दुस-या दिवशी रविवारी, सकाळी ११ वाजता विधानसभेच्या कामकाजाला सुरूवात कामकाजाला झाली. हंगामी अध्यक्ष कालिदास कोळंबकर यांनी शपथविधीचा कार्यक्रम पुकारताच पहिल्या दिवशी बहिष्कार टाकणा-या महाविकास आघाडीच्या लोकप्रतिनिधींपासून शपथविधाला सुरूवात झाली.

कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी हातात संविधानाचे पुस्तक घेऊन शपथ घेतली. विजय वडेट्टीवार, अस्लम शेख, ज्योती वाघमारे यांनी सभागृहात संविधान दाखवत शपथ पूर्ण केली. त्याचबरोबर माजी मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, मंगलप्रभात लोढा, भास्कर जाधव, नितीन राऊत, विजय वडेट्टीवार, चंद्रशेखर बावनकुळे, अब्दुल सत्तार, अमित विलासराव देशमुख, दिलीप सोपल, तानाजी सावंत, आदित्य ठाकरे, सुरेश धस, विश्वजीत कदम, सुनील प्रभू, ज्योती गायकवाड, सुनील प्रभू, अनंत नर, सुनील राऊत, विश्वजीत कदम, अमीन पटेल, प्रकाश आबीटकर, अजय चौधरी, रोहित पवार, राहुल आवाडे, हारुन खान, महेश सावंत, सुमित वानखेडे, रोहित पाटील यांच्यासह १०६ आमदारांनी शपथ घेतली.

आठ आमदार अनुपस्थितीत
विशेष अधिवेशनाच्या कार्यक्रम पत्रिकेत दोन दिवस नवनिर्वाचित आमदारांच्या शपथ विधीसाठी ठेवले होते. तर तिस-या दिवशी राज्यपालांचे अभिभाषण आणि विधानसभा अध्यक्षांची निवड असा कार्यक्रम जाहीर केला होता. २८७ पैकी पहिल्या दिवशी १७३ तर दुस-या दिवशी १०६ आमदारांनी शपथ घेतली. दरम्यान, उत्तमराव जानकर, विलास भुमरे, वरुण सरदेसाई, मनोज जामसुतकर, विनय कोरे, जयंत पाटील, शेखर निकम, सुनिल शेळके हे सदस्य अनुपस्थित राहिले. त्यापैकी जंयत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) अध्यक्ष शरद पवार सांगली जिल्ह्याच्या दौ-यावर असल्याने उपस्थित राहणार नाही, असे पत्र विधिमंडळाला दिले होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR