30.6 C
Latur
Saturday, March 2, 2024
Homeसोलापूरअभिषेक घोसाळकर हत्येप्रकरणी विरोधी पक्षांकडून निषेध

अभिषेक घोसाळकर हत्येप्रकरणी विरोधी पक्षांकडून निषेध

सोलापूर – शिवसेनेचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची निर्घृणपणे हत्या झाली. या घटनेनंतर महाराष्ट्रातील संपूर्ण जनता भीतीने ग्रासलेली असून, राज्यातील कायदा सुव्यवस्था राखण्यामध्ये गृहमंत्रालय आणि गृहमंत्री फडणवीस हे अपयशी ठरल्याचा आरोप करून या घटनेच्या निषेधार्थ सोलापुरात शिवसेना ठाकरे गट, काँग्रेस पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या वतीने एकत्रित श्रद्धांजली कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी दगडाला प्रती देवेंद्र फडणवीस म्हणून हार घालून निषेध नोंदवण्यात आला.

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काँग्रेस शहराध्यक्ष चेतन नरोटे, प्रवक्ते प्राध्यापक अशोक निंबर्गी, सेवादल यंग ब्रिगेडचे सुदीप चाकोते, युवक अध्यक्ष गणेश डोंगरे, महिला अध्यक्ष प्रमिला तुपलवंडे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अजय दासरी, जिल्हाप्रमुख गणेश वानकर, शहरप्रमुख विष्णू कारमपुरी, माजीमंत्री उत्तम प्रकाश खंदारे, महिला अध्यक्ष प्रिया बसवंती, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी महापौर महेश कोठे, प्रदेश उपाध्यक्ष भारत जाधव, महिला अध्यक्ष सुनिता रोटे, युवकचे प्रशांत बाबर यांच्यासह तीनही पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR