अमरावती : प्रतिनिधी
महायुती सरकारने अर्थसंकल्प सादर करताना राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सुरुवात केली. अशातच या योजनेवरून अमरावतीतील आमदार रवी राणा यांनी मतदानाच्या रूपाने मला आशीर्वाद नाही दिला तर योजनेची रक्कम परत घेऊ असे धक्कादायक वक्तव्य केले असून त्यांच्या या वक्तव्यावरून वादंग होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, महायुती सरकारने अर्थसंकल्प सादर करताना राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सुरुवात केली. सध्या राज्यभरात या एकाच सरकारी योजनेचे नाव चर्चेत आहे. सरकारने ही योजना जाहीर केल्यापासून महिलांचा या योजनेला प्रचंड प्रतिसाद पाहायला मिळतोय. अशातच या योजनेवरून अमरावतीतील आमदार रवी राणा यांनी आमचं सरकार आल्यावर लाडकी बहीण योजनेचे १५०० रुपयांचे आम्ही दुप्पट म्हणजे ३ हजार रुपये करू, तर आता त्यासाठी मला तुमचा आशीर्वाद हवा आहे. मात्र, तुम्ही मला आशीर्वाद दिला नाही तर मी तुमचा भाऊ म्हणून ते १५०० रुपये तुमच्या खात्यातून वापस घेणार, तसेच ज्याचं खाल्लं त्याचं जागलं पाहिजे. सरकार देत राहते, पण सरकारला आशीर्वादही दिला पाहिजे असे धक्कादायक वक्तव्य रवी राणांनी केले आहे.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे प्रमाणपत्र वितरण सोहळा आज अमरावतीत आमदार रवी राणा यांनी घेतला होता. या कार्यक्रमात हजारो महिला उपस्थित होत्या. या कार्यक्रमात आमदार रवी राणा यांनी हे धक्कादायक वक्तव्य केले.
लाडकी बहीण योजनेचे पैसे नेमके कधी येणार?
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा झाल्यापासूनच राज्यभरातील महिलांनी योजनेचा अर्ज भरण्यासाठी गर्दी केली होती. अशातच आता राज्यातील महिलांना लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता १७ ऑगस्ट रोजी महिलांच्या खात्यात जमा होणार असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट केले.