34.2 C
Latur
Sunday, April 20, 2025
Homeमहाराष्ट्रदारू कारखाना बंदीचा आदेश काढा : डॉ. बंग

दारू कारखाना बंदीचा आदेश काढा : डॉ. बंग

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात एलबीटी बिव्हरेज नावाने मोहफुलापासून दारू बनवण्याचा कारखान्याच्या विरोधात ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि जिल्हा दारू मुक्ती संघटनेचे अध्यक्ष डॉ. अभय बंग यांनी तीव्र विरोध दर्शविला आहे.

या कारखान्याच्या विरोधात आज नागपुरात डॉ. अभय बंग यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन हा कारखाना रद्द करण्याचा शासकीय आदेश काढण्याची मागणी केली आहे. सोबतच जिल्ह्यातील एकूण ५७,८९६ नागरिकांनी सह्या करून पारित केलेले १,०३१ प्रस्ताव देखील सरकारला सादर केले.

गडचिरोली एमआयडीसीमध्ये एलबीटी बिव्हरेज नावाने मोहफुलापासून दारू बनवण्याचा कारखाना राज्य सरकारने प्रस्तावित केला होता. मात्र, गडचिरोली जिल्ह्यात गेल्या ३० वर्षांपासून दारूबंदी आहे. नागपुरात विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू असताना एवढी मोठी आदिवासी द्रोही कृती केल्याबद्दल त्यांनी नाराजी ही व्यक्त केली होती.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR