22.9 C
Latur
Monday, July 22, 2024
Homeराष्ट्रीयपीएम मोदी इटली दौ-यावर

पीएम मोदी इटली दौ-यावर

नवी दिल्ली : जी ७ परिषदेत सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी इटलीला रवाना झाले. पंतप्रधान मोदींच्या तिस-या कार्यकाळातील हा पहिलाच विदेश दौरा आहे. इटलीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी इटलीचे पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. युक्रेनमध्ये सुरू असलेले युद्ध आणि गाझामधील संघर्षावर १३ ते १५ जून दरम्यान इटलीमध्ये होणा-या जी-७ शिखर परिषदेत घमासान होण्याची शक्यता आहे.

जी ७ चे पूर्ण नाव ग्रुप ऑफ सेव्हन आहे. जो एक अनौपचारिक जागतिक गट आहे. या गटात इटली, कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, जपान, युनायटेडकिंगडम आणि अमेरिकेचा समावेश आहे. युरोपियन युनियन देखील या गटात सहभागी आहे. जी-७ ची ​​स्थापना १९७३ च्या ऊर्जा संकटानंतर आर्थिक सहकार्यासाठी करण्यात आली. पहिली जी-७ शिखर परिषद १९७५ मध्ये फ्रान्समध्ये झाली आणि त्यात फ्रान्स, अमेरिका, यूके, जर्मनी, जपान आणि इटली यांचा समावेश होता. त्यानंतर १९७६ मध्ये, कॅनडाचा देखील यामध्ये समावेश झाला.

१९९७ आणि २०१३ दरम्यान, जी-७ चा जी-८ मध्ये विस्तार झाला, ज्यामध्ये रशियाचाही समावेश करण्यात आला होता. परंतु, २०१४ मध्ये क्राइमियाचा ताबा घेतल्यानंतर रशियाला यातून निलंबित करण्यात आले. दरवर्षी १ जानेवारीपासून, एक सदस्य देश या गटाचे नेतृत्व करतो. इटलीने १ जानेवारी २०२४ रोजी जपानकडून अध्यक्षपद स्वीकारले. ते ३१ डिसेंबर २०२४ रोजी याचे अध्यक्षपद कॅनडाकडे सुपूर्द करतील. या शिखर परिषदेला सात सदस्य देशांचे प्रमुख, युरोपियन युनियनचे प्रतिनिधी, आमंत्रित देश आणि आंतरराष्ट्रीय संस्था उपस्थित असतात.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR