22.9 C
Latur
Monday, July 22, 2024
Homeमहाराष्ट्रम्हणून काकुला उमेदवारी दिली : रोहित पवार

म्हणून काकुला उमेदवारी दिली : रोहित पवार

बारामती : विकासासाठी पैसे पाहिजे आणि कारवाईचा ससेमिरा चुकला पाहिजे, यासाठी अजित पवार यांच्यासोबत काही नेते आणि आमदार गेले आहेत. त्यांच्या मनात चलबिचल सुरू असून ब्रह्मदेव आला तरी आता अजितदादांसोबत आमदार राहणार नाहीत, असे वक्तव्य राष्ट्रवादीचे (शरदचंद्र पवार गट) आमदार रोहित पवार यांनी केले. त्याचवेळी मुलगा किंवा बायको सोडून जाणार नाही याची खात्री अजितदादांना खात्री असावी म्हणून त्यांनी घरातच राज्यसभेची उमेदवारी दिली, अशी टोलेबाजी करत रोहित पवार यांनी सुनेत्रा पवार यांचे अभिनंदन केले.

लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला घवघवीत यश मिळाल्यानंतर ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आपले पुढील लक्ष विधानसभा निवडणूक असल्याचे स्पष्ट केल्यानंतर त्या अनुषंगाने कामालाही लागले आहेत. इंदापूर आणि बारामतीमधील दुष्काळी भागाची पाहणी केल्यानंतर शरद पवार यांनी दौंड तालुक्यातील दुष्काळी भागातील जनतेशी संवाद साधला. इकडे त्यांचे नातू रोहित पवार यांनी लोकसभा निवडणूक निकालानंतर प्रथमच बारामतीत पत्रकार घेऊन विविध मुद्द्यांना स्पर्श केला.

मुलगा किंवा बायको पक्ष सोडून जाणार नाही याची खात्री अजितदादांना असावी. म्हणून त्यांनी घरातच उमेदवारी दिली. त्यांच्यासोबत असलेले नेते आमदार, इथून पुढच्या काळात त्यांच्यासोबत राहतील, अशी कोणतीही शाश्वती नाही. त्यामुळे पुढच्या सहा वर्षासाठी कुठले तरी पद आपल्याबरोबर असावे या दृष्टिकोनातून दादांनी कदाचित सुनेत्रा काकींना उमेदवारी दिली असावी, असे टोले रोहित पवार यांनी लगावले.

सुनेत्रा पवार यांची राज्यसभेवर बिनविरोध निवड होणार असून त्यांच्या केंद्रीय राज्यमंत्रिपदाच्याही चर्चा सुरू झाल्या आहेत. याविषयी पत्रकारांनी रोहित पवार यांना विचारले असता ते म्हणाले, अजित पवार यांनी आधीच सांगितले होते की राज्यमंत्रिपद आम्हाला शोभणारे नाही. काकींना राज्यमंत्रिपद दिले तर अजित पवारांना यावर स्पष्टीकरण द्यावे लागेल. त्यांच्या पक्षात काय सुरू आहे हे अजित पवारांना माहिती आहे. म्हणून त्यांनी इतरांना उमेदवारी न देता काकींना दिली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR